Railway Mega Block: रविवारी मेगा ब्लॉक; जाणून घ्या रेल्वेच्या वेळापत्रकातील बदल

Mumbai Local Train Mega Block: अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने मेगा ब्लॉक घोषीत केला आहे.
Mega Block On Sunday
Mega Block On Sunday Saam tv
Published On

मुंबई: अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने मेगा ब्लॉक (Mega Block) घोषीत केला आहे. रविवार दि. २१.८.२०२२ रोजी हा मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रसिद्धी पत्रकानुसार, उद्या दि. २०/२१.८.२०२२ (शनिवार/रविवार रात्री) रोजी भायखळा - माटुंगा अप आणि डाउन जलद मार्गावर दि. २०.८.२०२२ च्या रात्री ११.३० ते २१.८.२०२२ च्या पहाटे ४.३० पर्यंत जलद मार्गावर, दि. २१.८.२०२२ रोजी सकाळी १२.४० ते ०५.४० पर्यंत डाउन जलद मार्गावर आणि दि. २१.८.२०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ०५.२० वाजता सुटणारी डाउन जलद मार्गावरील लोकल भायखळा आणि माटुंगा दरम्यानच्या धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि ती नियोजित थांब्यांवर थांबून गंतव्यस्थानी १० मिनिटे उशिरा पोहोचेल. (Mumbai Local Mega Block News)

हे देखील पाहा -

त्याचप्रमाणे, ठाणे येथून दि. २०.८.२०२२ रोजी रात्री १०.५८ आणि ११.१५ वाजता सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील आणि निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्शन

12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. दादर प्लॅटफॉर्म क्रमांक १ येथे या गाडीला दुहेरी थांबा दिला जाईल आणि रोहा येथे १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.

11058 अमृतसर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 11020 भुवनेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस आणि 12810 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर मार्गे मेल, माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्यांना दादर प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर दोनदा थांबा दिला जाईल आणि गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशीराने पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल - कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) विभागात विशेष लोकल अंदाजे २० मिनिटांच्या वारंवारतेने धावतील.

Mega Block On Sunday
Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी

हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइनआणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी असेल. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com