Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी

Tiger Attack In Bhandara: भाजीपले कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची गावकऱ्यांची मागणी.
Tiger Attack In Bhandara
Tiger Attack In Bhandaraअभिजीत घोरमारे
Published On

भंडारा: भंडारा (Bhandara) जिल्हात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्या जनावरांना शेतावर चराईसाठी नेत असलेल्या या शेतकऱ्यावर वाटतेच वाघाने हल्ला (Tiger Attack) चढवला. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील सावरला येथील ही थराराक घटना आहे. वाघाच्या हल्ल्यात या पशुपालक शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. (Bhandara Tiger Attack)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश मोतीराम भाजीपाले (47) असे या मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. सकाळच्या सुमारास ते आपल्या शेतावर बैलांना चराईसाठी घेऊन गेले होते. दिवसभर शेतात थांबल्यानंतर सायंकाळच्या सुमारास घरी परत येत असतांना वाटेतच वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला. यात वाघाने शेतकऱ्याला जंगल शिवारात ओढत नेले. लागलीच सोबताच्या व्यक्तिने गावात धूम ठोकत गावकऱ्यांना ही आपबीती सांगताच गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्याचा शोध घेतला.

Tiger Attack In Bhandara
नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबाला मृत्यूनं गाठलं, दोघांचा जगीच मृत्यू, आठ जखमी

अखेर गावाजवळच्या शेतशिवारातील झुडपात त्यांचा मृतदेह आढळून आला. आता भाजीपले कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात असून त्या नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com