water crisis hits maharashtra nandurbar sambhajinagar malegaon Saam Digital
महाराष्ट्र

Water Crisis Hits Maharashtra: पाणीसाठ्यात घट, नंदुरबारमध्ये 195 गावांना टंचाईच्या झळा; मालेगाव, हरसुलमध्ये भीषण स्थिती

अनेक विहिरी आणि हातपंप आटल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे / अजय सोनवणे / रामनाथ ढाकणे

Water Scarcity :

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 195 गावांना पाणीटंचाईची झळ बसली आहे. नाशिकच्या मालेगाव महापालिका हद्दीतील दरेगाव भागातील इनामदरा भागातील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे देखील पाण्यासाठी नागरिक आसुसलेले आहेत. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्ह्यातील 195 गावांना पाणीटंचाईच्या झळा

नंदुरबार जिल्ह्यातील 195 गावांना पाणीटंचाईच्या सामना करावा लागत आहे. एक हंडा पाणी भरण्यासाठी आदिवासी महिलांना आपल्या लहान लेकरांना घेऊन डोंगराळ भागातून पाणी घ्यायला जावं लागत असल्याची परिस्थिती आदिवासी पाड्यांवर पाहायला मिळत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील भूजल पातळी ही साडेपाच फुटांपर्यंत खाली गेल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्हाभरातील अनेक विहिरी आणि हातपंप आटल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे.

इनामदरा येथे पाण्यासाठी आदिवासी महिलांची भटकंती

नाशिकच्या मालेगाव महापालिका हद्दीतील दरेगाव भागातील इनामदरा येथील अनेक वर्षांपासून राहणा-या आदिवासींना यंदा पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. इनामदरा वस्तीवर असलेल्या कुपनलिका आटल्याने त्यातून मिळणा-या थेंब थेंब पाणी कसे बसे जमा करुन भरावे लागत आहे. यामुळे वस्तीवरील महिलांचा पाण्यासाठी तासनतास वेळ जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विशेष म्हणजे इनामदरा आदिवासी वस्ती महापालिका हद्दीत असून ही महापालिकेने तेथे पाण्याची सोय केलेली नाही. त्यामुळे या भागातील नागरीकांना पाण्यासाठी अन्यत्र भटकंतीची वेळ आली आहे.

संभाजीनगरमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम 15 जूनपर्यंत पूर्णत्वास

छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठ्याचा गॅप कमी करण्यासाठी महापालिकेने नव्या 900 मिलिमीटरच्या व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित केली. मात्र फारोळा जल शुद्धीकरण केंद्रात नव्याने उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम अद्याप अपूर्णच असल्याने ते 15 जूनपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे. त्यानंतरच पूर्ण क्षमतेने 900 मिलिमीटरच्या जलवाहिनीतून शहराला पाणीपुरवठा करण्यात येईल. सोबतच पाण्याचा गॅपही कमी होईल असं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान उन्हाच्या तीव्रतेमुळे शहरात पाण्याची मागणी वाढली असताना नागरिकांना हे वाढीव पाणी देणे शक्य होत आहे. दरम्यान पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक जलवाहिन्या जीर्ण झाल्याने फुटत आहे तर दुसरीकडे हरसुल तलावातील पाण्याची ही पाणी पातळी कमी झाल्याने या तलावाचा पाणीपुरवठा बंद झाला असला तरीही या जलवाहिनीतूनही तूट भरून निघेल आणि 15 जून पर्यंत हे काम पूर्ण होईल असा विश्वास महापालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Eknath Shinde Press Conference: साष्टांग दंडवत! शिंदे- फडणवीस- पवार लाडक्या मतदारांसमोर नतमस्तक; पाहा VIDEO

Amit Thackeray: मुंबईत राज ठाकरेंना धक्का, अमित ठाकरेंचा पराभव; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने मैदान मारलं

Maharashtra Politcs : सहानभुती संपली, मविआ हारली; आघाडीच्या पराभवाची कारणे काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nawab Malik News : मानखुर्दमध्ये नवाब मलिक यांचा पराभव | Marathi News

SCROLL FOR NEXT