उदयनराजे भाेसलेंसाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस साता-यात; शशिकांत शिंदेंसाठी शरद पवार आज पुन्हा पावसातील सभेच्या मैदानावरुन काेणती साद घालणार?

महायुतीचे उमेदवार उदयनराजे भाेसले यांच्यासाठी दाेन उपमुख्यमंत्री येत असून दूसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील आज साता-यात येणार आहेत.
today rallies in satara of sharad pawar ajit pawar and devendra fadnavis for udayanraje bhosale and shahikant shinde
today rallies in satara of sharad pawar ajit pawar and devendra fadnavis for udayanraje bhosale and shahikant shindeSaam Digital

Satara Lok Sabha Election :

सातारा लोकसभा मतदारसंघात आज (शनिवार) राज्यातील प्रमुख नेते त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. यामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा हाेणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामाेडींमुळे आज साता-यात राज्यातील दिग्गज नेते काय बाेलणार, कुणावर निशाणा साधणार याची उत्सुकता मतदारांमध्ये लागली आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

वाईत अजित पवार काय बाेलणार?

खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाई येथे सकाळी अकरा वाजता जाहीर सभा आयाेजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांनी अजित पवार गटासमवेत राहणे पसंत केले. या मतदारसंघात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा माेठा प्रभाव आहे. त्यामुळे आजच्या सभेत अजित पवार हे नेमकं काय बोलणार, मतदारांना कशा प्रकारे साद घालणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

today rallies in satara of sharad pawar ajit pawar and devendra fadnavis for udayanraje bhosale and shahikant shinde
Kalyan Constituency : कल्याणमध्ये शेवटच्या दिवशी ४० उमेदवारांचे अर्ज, अभिजीत बिचुकलेही मैदानात; सगळेच काहीसे बिचकले!

फडणवीसांची पाटण, साता-यात सभा

दूसरीकडे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांची दुपारी दोन वाजता बाजार समिती मैदानावर सभा आयाेजित करण्यात आली आहे. पाटण हा शंभूराज देसाईंचा बालेकिल्ला मानला जाताे. तेथे उपमुख्यमंत्री फडणवीस काेणते मुद्दे मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या सभेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस हे सातारा शहरातील तालीम संघ मैदानावर जाहीर सभेस येणार आहेत. त्यापूर्वी उदयनराजेंसमवेत फडणवीस हे रॅलीत सहभागी होणार आहेत.

today rallies in satara of sharad pawar ajit pawar and devendra fadnavis for udayanraje bhosale and shahikant shinde
Abhijeet Patil: माढ्यात माेठ्या राजकीय घडमाेडी, विठ्ठल कारखान्यावरील जप्ती मागे; अभिजीत पाटील करणार भाजपला मदत, Video

शरद पवारांची झेडपी मैदानावर सभा

महायुतीचे उमेदवार उदयनराजे भाेसले यांच्यासाठी दाेन उपमुख्यमंत्री येत असून दूसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील आज साता-यात येणार आहेत. साताऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर सायंकाळी पाच वाजता पवार यांची जाहीर सभा होणार आहे. याच मैदानावरुन पवार यांनी गत पाेटनिवडणुकीत भरपावसात मतदारांना साद घालीत श्रीनिवास पाटील यांनी विजयी करण्याचे आवाहन केले हाेते. आज त्याच मैदानावर साताऱ्यात शरद पवार काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहणार हे निश्चित.

Edited By : Siddharth Latkar

today rallies in satara of sharad pawar ajit pawar and devendra fadnavis for udayanraje bhosale and shahikant shinde
Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: तेरणा कारखान्यातील भंगारावरुन तानाजी सावंतांचा ओमराजेंवर निशाणा, व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com