Kalyan Constituency : कल्याणमध्ये शेवटच्या दिवशी ४० उमेदवारांचे अर्ज, अभिजीत बिचुकलेही मैदानात; सगळेच काहीसे बिचकले!

एखादा उमेदवार जाहीर केल्यानंतर दुसरा उमेदवार दिला, त्यात लोकांमध्ये काही फरक पडत नाही उलट नुकसान होत असते. हा दबाव तंत्राचा भाग असू शकतो असेही गोपाळ लांडगे यांनी नमूद केले.
gopal landge criticizes abhijeet bichukale on kalyan lok sabha nomination
gopal landge criticizes abhijeet bichukale on kalyan lok sabha nominationSaam Digital
Published On

- अभिजीत देशमुख

Kalyan Lok Sabha Election :

प्रसिद्ध उमेदवारा समोर उमेदवारी अर्ज दाखल करून प्रसिद्धी मिळविण्याच्या उद्देशाने अनेक जण उमेदवारी अर्ज दाखल करतात. त्यामुळेच कल्याण लोकसभा मतदारसंघातून आज भरमसाठ अर्ज दाखल झाले आहेत अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भोपाळ लांडगे यांनी अभिजीत बिचकुले (abhijeet bichukale) यांचा नामाेल्लेख टाळत केली. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

कल्याण लोकसभा मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवस हाेता. आज अखेरच्या दिवशी कल्याण लोकसभा मतदारसंघातून 40 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अखेरच्या दिवशी इतक्या माेठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने अनेक जण बिचकले देखील आहेत. त्यावर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भोपाळ लांडगे यांनी मात्र खिल्ली उडवली.

gopal landge criticizes abhijeet bichukale on kalyan lok sabha nomination
MNS Leader Avinash Jadhav: सराफ व्यापाऱ्याकडे ५ कोटी मागितले? मनसे नेते अविनाश जाधवांनी आराेप फेटाळले

कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे म्हणाले आज अनेकांनी एकापेक्षा जास्त अर्ज उमेदवारांनी दाखल केलेले असल्याने ते माघार घेतील. तसेच हौसेने रिंगणात उतरलेले ही काही उमेदवार माघार घेतील. कोणीही प्रतिस्पर्धी असले तरी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना फरक पडणार नाही असेही लांडगेंनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा दबाव तंत्राचा भाग : गोपाळ लांडगे

दरम्यान ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे याबाबत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी ही रणनीती असू शकते मात्र त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही. एखादा उमेदवार जाहीर केल्यानंतर दुसरा उमेदवार दिला, त्यात लोकांमध्ये काही फरक पडत नाही उलट नुकसान होत असते. हा दबाव तंत्राचा भाग असू शकतो असेही गोपाळ लांडगे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

gopal landge criticizes abhijeet bichukale on kalyan lok sabha nomination
SRPF जवानाची किरकाेळ कारणावरून निर्घृण हत्या; किरकोळ कारण, पण घडलं भयंकर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com