Washim ZP
Washim ZP Saam tv
महाराष्ट्र

Washim ZP : जिल्हा परिषदेत लेट आलेले ५० कर्मचारी बाहेर ताटकळले; सीईओंकडून देण्यात आली तंबी

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : कार्यालयीन वेळ होऊन देखील अनेक कर्मचारी उशिराने येत असतात. याबाबत असलेल्या तक्रारीवरून (Washim) वाशिम जिल्हा परिषदेचे सीईओ वैभव वाघमारे यांनी आज उशिरा येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना धक्का दिला. उशिरा आलेल्या सर्वांना गेटच्या बाहेरच उभे करून ठेवले होते. (Tajya Batmya)

सध्या सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये मार्च एन्डचे कामकाज सुरु आहे. यामुळे बहुतांश ठिकाणी उशिरापर्यंत कामकाज चालत असते. मात्र काही कर्मचारी हे उशिराने येत असतात. वाशीम जिल्हा परिषदेचे सीईओ वैभव वाघमारे यांच्या निदर्शनास आले होते. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या (Zilha Parishad) मुख्य इमारतीचे तिनही प्रवेशद्वारे सकाळी ९.५० वाजता बंद करुन त्यांना कुलुप लावण्याचे आदेश सीईओनी दिले होते. यामुळे उशिरा येणाऱ्यांना बाहेरच ताटकळत थांबण्याची वेळ आली. गेटबाहेर येऊन सीईओ वाघमारे यांनी उशिरा येणाऱ्या ५० कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागरिकही ताटकळले  
जिल्हा परिषदेत मार्च एंडच्या कामाची लगबग सुरु असुन सकाळी- सकाळी जिल्हा परिषदेचे तीनही चॅनल गेट कुलुप बंद दिसल्याने काही क्षण कर्मचाऱ्यांसह बाहेरुन येणारे नागरिकही बुचकाळ्यात पडले होते. सकाळी कामानिमित्ताने जिल्हा परिषदेत आलेले नागरिक देखील घेतला कुलूप असल्याने बाहेरच ताटकळत थांबले होते.

तर ३० मिनिट उशिरा येण्याची मुभा 

अधिकारी व कर्मचारी यांनी सकाळी ९..४५ वाजता मुख्य प्रवेशद्वाराच्या आत येणे बंधनकारक राहिल. अतिमहत्वाच्या घरगुती कामामुळे अथवा अपवादात्मक परिस्थितीत कार्यालयात येण्यास विलंब होणार असल्यास ९.३० वाजण्यापूर्वी विभाग प्रमुखांनी सीईओ यांना वैयक्तिकरित्या व ईतर अधिकारी कर्मचारी यांनी जि. प. मुख्यालय या व्हाट्सअप ग्रुपवर कारणांसह कळवावे. असे केल्यास संबंधितांना कार्यालयात ३० मिनिट उशिरा येण्याची मुभा मिळेल असे निर्देश सीईओ वाघमारे यांनी यापूर्वीच सर्वांना दिले होते. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk: रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे म्हणजे आजारांना आमंत्रण; शरीरावर होतो दुष्परिणाम

Maharashtra Lok Sabha Voting Live: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा

Shivrajyabhishek Sohala 2024 : शिवराज्याभिषेक सोहळ्याला आचारसंहितेचा अडसर? सरकारने मार्ग काढावा : संभाजीराजे

Red Saree Look: लाल साडीत खुललं अभिनेत्रीचं मराठमोळं सौंदर्य; Photo पाहा

Dhule Loksabha Election: मतदान केंद्रावर उघडपणे भाजपचा प्रचार; राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आक्षेप

SCROLL FOR NEXT