Washim road accident Saam tv news
महाराष्ट्र

वाशिममध्ये भीषण अपघात; भरधाव कारनं दोघांचा जीव घेतला, बायकोसमोरच नवऱ्याचा मृत्यू

Washim Road accident news: वाशिम जिल्ह्यात कारंजा - दारव्हा मार्गावर बोलेरोने दोन दुचाकींना धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी.

Bhagyashree Kamble

  • वाशिम जिल्ह्यात कारंजा - दारव्हा मार्गावर बोलेरोने दोन दुचाकींना धडक दिली.

  • या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी.

  • पोलीस तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही.

वाशिममधून एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. कारंजा - दारव्हा मार्गावर बोलेरो पिकअपनं दोन दुचाकींना धडक दिली आहे. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन व्यक्ती रस्त्यावर कोसळले. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोन गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेत जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल केलं. मात्र, दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

या भीषण अपघाताची घटना वाशिमच्या कांरजा दारव्हा मार्गावर घडली आहे. भरधाव बोलेरो पिकअपनं कारंजाच्या दिशेनं येत असलेल्या पावर हाऊसजवळील एका दुचाकीला धडक दिली. दुचाकीवर २ जण प्रवास करीत होते. दुचाकीच्या मागून भरधाव बोलेरोनं दुचाकीला धडक दिली.

या अपघातात दुचाकीवरील दोघेही खाली कोसळले. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तर, दोन जण जखमी असल्याची माहिती आहे. सुभाष किशन चव्हाण (वय वर्ष ५५), नाना जयसिंगपूर (वय वर्ष ५६) असे मृत व्यक्तींचे नाव आहे. तर, जयाताई नाना जयसिंगपुरे (वय वर्ष ४८) आणि प्रभू माणिक राठोड (वय वर्ष ४८) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

भीषण अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले आहे. हा अपघात नेमका कसा घडला? याचा तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Teacher Salary Increment: खुशखबर! गणेशोत्सवात शिक्षकांची दिवाळी, वेतनवाढ मिळणार

Bhandardara Dam : भंडारदरा व निळवंडे धरण ओव्हरफ्लो; पाण्याचा विसर्ग वाढविल्याने प्रवराला मोठा पूर

Google Calling Update: तुमची पण कॉलिंग स्क्रीन बदलली आहे? जुनी स्क्रीन हवी आहे? मग आताच करा 'ही' सेटिंग

Ukdiche Modak: घरच्या घरी उकडीचे मोदक कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीमध्ये कार खड्ड्यात गेली, चालक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT