Washim Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Washim Accident: क्षणात सर्वकाही संपलं! भरधाव पिकअपने दुचाकीला चिरडलं, आईच्या डोळ्यासमोर २ मुली अन् नवऱ्याने सोडले प्राण

3 People Died In Washim Accident: वाशिममध्ये भरधाव पीकअपने दुचाकीला चिरडलं. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

Priya More
  • वाशिममध्ये महामार्गावरील भीषण अपघात

  • पिकअपने दुचाकीला दिली जोरदार धडक

  • आईसमोर २ मुली आणि नवऱ्याचा मृत्यू

  • या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत

मनोज जयस्वाल, वाशिम

वाशिममध्ये भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव पिकअपने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाले आहे. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वडील आणि दोन मुलांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताच तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम– कनेरगाव मार्गावर देवठाणाजवळ हा भीषण अपघात झाला. पिकअप आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. दुचाकीवरून नवरा-बायको आणि दोन मुली जात होत्या. त्यावेळी पीकअपने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील चौघेही उडून रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडले. आईच्या डोळ्यासमोह दोन मुली आणि नवऱ्याचा मृत्यू झाला. अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे.

अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये दोन मुलींचा समावेश आहे. एक मुलगी ५ वर्षांची तर दुसरी १२ वर्षांची होती. अपघातामध्ये मृत्यू झालेले एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ज्ञानेश्वर निवृत्ती खडसे, किर्ती खडसे, केतकी खडसे अशी अपघातातील मृतकांची नावं आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT