Washim Railway Saam Digital
महाराष्ट्र

Washim Railway : शकुंतला रेल्वेचा ट्रॅकच गेला चोरीला, घटनेने खळबळ; नेमकं काय आहे प्रकरण?

Indian Railway : एकेकाळी पश्चिम वऱ्हाडाची लोकवाहीनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटीशकालीन शंकुतला रेल्वेचा तब्बल २० फूट अंतराचा लोहमार्ग चोरीला गेल्याची खळबळजनक घटना वाशीमच्या कारंजामध्ये घडली आहे.

Sandeep Gawade

एकेकाळी पश्चिम वऱ्हाडाची लोकवाहीनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटीशकालीन शंकुतला रेल्वेचा तब्बल २० फूट अंतराचा लोहमार्ग चोरीला गेल्याची खळबळजनक घटना वाशीमच्या कारंजामध्ये घडली आहे. शंकुतला रेल्वेच्या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याला मंजुरी मिळाली आहे मात्र ऐतिहासिक नॅरोगेजचे लोहमार्ग आजही पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यात पसरले आहेत. आजही या लोहमार्गाची मालकी ब्रिटिश कंपनीकडे असून अज्ञातांनी जवळपास २० फूट अंतराचा रेल्वे मार्ग कटरच्या सहाय्याने कापून वेगळा केला आणि त्याखालील जवळपास दोन ते तीन क्विंटल वजनाचे लोखंड गायब केले.

ज्यावेळी भारतात दळणवळणाची साधनं उपलब्ध नव्हती त्यावेळी ब्रिटीशांनी ही ट्रेन सुरू केली होती. यवतमाळमधून मुंबईला कापूस आणण्याचा मुख्य उद्देश ब्रिटीशांचा होता. नंतरच्या काळात याच ट्रेनमधून प्रवासी वाहतूक सेवा सुरू आली पण काळाच्या ओघात ही ट्रेन नॅरोगेज असल्याने बंद झाली. मार्चमध्ये या रेल्वेबाबत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्धा खर्च उचलण्याची घोषणा केली होती.

मुंबई मार्गे मँचेस्टरला विदर्भातील कापूस नेण्याच्या मूळ उद्देशाने ब्रिटिशांनी यवतमाळ ते मूर्तिजापूर हा रेल्वेमार्ग उभारला होता. पुढच्या काळात या मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू झाली. त्यानंतर मध्य रेल्वेने प्रवासी रेल्वेची जबाबदारी स्वीकारली आणि मूर्तिजापूर ते यवतमाळ मार्गावर शकुंतलेचा प्रवास सुरू झाला. मात्र सध्या या रेल्वेचा ट्र्रॅकच गायब करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WPL 2025 Retention: महिला प्रीमियर लीगची रिटेन्शन लिस्ट जाहीर,कोणत्या संघांनी कोणत्या खेळाडूंना केलं बाहेर?

Maharashtra Election: मराठा समाजाचा फेव्हरेट पक्ष कोणता? मराठा समाज कुणाचं गणित बिघडवणार?

Assembly Election: नवाब मलिकांच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात; भाजपच्या विरोधाला दादांचा ठेंगा

Worli Politics: वरळीत फोडाफोडी, खोक्याचं राजकारण सुरू झालं; मिलिंद देवरा यांची टीका

Suniel Shetty Injury : सुनील शेट्टी जखमी; अॅक्शन सीन करताना दुर्घटना, सेटवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT