Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim : पाणीटंचाईची झळ; ट्रॅक्टरने पाणी आणून फळबाग वाचवण्याचा प्रयत्न

Washim News : राज्यात पाणीटंचाईचे संकट गडद होत चालले आहे. दिवसेंदिवस वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. तर जमिनीतील पाण्याचे स्रोत देखील आटू लागले आहेत

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: पाणीटंचाईची झळ सर्वत्र जाणवू लागली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. तर दुसरीकडे पिकांना पाणी देण्याचा प्रश्न देखील तितकाच गंभीर झाला आहे. वाढत्या उन्हाच्या झळांमध्ये फळबागा वाचविण्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. आता यावर उपास म्हणून ट्रॅक्टरने पाणी आणून फळबाग वाचविण्याचा प्रयत्न शेतकऱ्याकडून करण्यात येत असल्याचे वाशीम जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे.

राज्यात पाणीटंचाईचे संकट गडद होत चालले आहे. दिवसेंदिवस वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. तर जमिनीतील पाण्याचे स्रोत देखील आटू लागले आहेत. यामुळे पाणी संकट गडद होत चालले आहे. गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वाढला असून या सोबतच पिकांना पाणी देणे देखील आता जिकरीचे झाले आहे. असेच चित्र वाशीम जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. 

पिकांना ट्रॅकरने पाणी 

वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईच संकट अधिक गडद होत चालले आहे. धरण, विहीर, बोअरवेलच्या पाणी पातळी तळाला गेली आहे. परिणामी लाखो रुपये खर्चून उभी केलेली फळबाग वाचविण्यासाठी शेतकऱ्याना धडपड करावी लागत आहे. वाशिमच्या सोयता शेत शिवारात फळबाग वाचवण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने बाहेरून पाणी आणून आपल्या फळबाग वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

भर उन्हाळ्यात नदीला पूर 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे नदी नाले आता प्रवाहित झाले आहेत. यातच मोरांबा नदीला पूर आल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून अवकाळी पावसाची हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे अनेक घरांची पडझड झाल्यामुळे मोठं नुकसान झाला आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे भर उन्हाळ्यात मोरांबा नदीला पूर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT