Water Crisis : जळकोट तालुक्यातल्या नऊ गावांना पाणीटंचाई; पाण्यासाठी नागरिकांची जीवघेणी कसरत

Latur News : मार्च महिन्यापासून उन्हाच्या झळा जाणवण्यास सुरवात झाली आहे. तेव्हापासून राज्यात पाणीटंचाई जाणविण्यास सुरवात झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असताना त्यानुसार पाणी टंचाईची समस्या देखील गडद
Water Crisis
Water CrisisSaam tv
Published On

संदीप भोसले 
लातूर
: पाणी टंचाईच्या झळा राज्यात तीव्र होत असल्याचे पाहण्यास मिळत आहेत. यामुळे नागरिकांना पायपीट करत पाणी आणावे लागत आहे. अशातच लातूर जिल्ह्यातील अनेक भागात देखील पाणी टंचाईची समस्या गडद झाली असून जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील तब्बल ९ गावांमध्ये भीषण टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे गावातील नागरिकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

मार्च महिन्यापासून उन्हाच्या झळा जाणवण्यास सुरवात झाली आहे. तेव्हापासून राज्यात पाणीटंचाई जाणविण्यास सुरवात झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असताना त्यानुसार पाणी टंचाईची समस्या देखील गडद होण्यास सुरवात झाली आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यात पाणी टंचाईची गडद छाया निर्माण झाली आहे. आगामी काळात हि समस्या अधिक गडद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

Water Crisis
Accident News : मुलीला सीईटी परीक्षेसाठी घेऊन गेलेल्या पित्यावर काळाचा घाला; मुलीसह एकजण जखमी

तीन ट्रॅकरद्वारे पाणी पुरवठा 

लातूरच्या जळकोट तालुक्यातील नऊ गावांना पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. आजूबाजूच्या परिसरात असलेल्या धरणातील तसेच तलाव व नदीला पाणी आटल्याने पाण्याचे स्रोत आटलेले आहे. यामुळे भीषणता वाढत आई. जून महिना जसा जसा जवळ येईल तशी तालुक्यातील पाणीटंचाई अधिक तीव्र होत चालली आहे. या गावांना प्रशासनाच्या वतीने तीन टँकर आणि विहीर अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

Water Crisis
Manmad News : मनमाडच्या अंकाई किल्ला परिसरात स्फोट; आवाजाचे गूढ कायम, नागरिकांमध्ये घबराट

ग्रामपंचायतींना आवाहन 

जळकोट तालुक्यातल्या शिवाजीनगर तांडा, अग्रवाल तांडा ,रामपूर तांडा, मरसांगवी, होकर्णा आणि जवळपूर यासह इतर गावांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा आहेत. याठिकाणी ट्रॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. दरम्यान आणखीन कोणत्या गावात पाणीटंचाई जाणवत असेल तर ग्रामपंचायतीने अर्ज करण्याचा आव्हान तहसीलदार यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com