Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim : टोल प्लाझा कर्मचाऱ्यांचे कामबंद; साडेआठ लाख रुपयांचे नुकसान, आंदोलक कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

Washim News : अकोला – हैद्राबाद महामार्गावरील वाशिमच्या तोंडगाव येथे असलेल्या टोलप्लाझाच्या कर्मचाऱ्यानी रात्री १० वाजेपासून विविध मागण्यांना घेऊन कामबंद आंदोलन सुरू केले

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: विविध मागण्यांसाठी टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. रविवारी रात्री १० वाजेपासून हे कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले असून मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा टोल देखील घेतला जात नाही. यामुळे टोल प्लाझाचे सुमारे साडेआठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान नियमबाह्य पद्धतीने आंदोलन करण्यात येत असल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

अकोला – हैद्राबाद महामार्गावरील वाशिमच्या तोंडगाव येथे असलेल्या टोलप्लाझाच्या कर्मचाऱ्यानी रात्री १० वाजेपासून विविध मागण्यांना घेऊन कामबंद आंदोलन सुरू केले आहे. तर कंपनीने बॉन्सर बोलावून दमदाटी केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. रात्री दहा वाजेपासून सकाळी दहा वाजेपर्यंत साधारणपणे या टोल प्लाझाचे साडेआठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 

अशा आहेत मागण्या 
टोल प्लाझाच्या कामगारांची मेडिकल इन्शुरन्स, एक्सीडेंटल इन्सुरन्स यासह अनेक मागण्या आहे. या मागण्यांना घेऊन रिद्धी सिद्धी असोसिएट व्यवस्थापक यांनी कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. तरी देखील मागण्या अद्याप मान्य न केल्याने कामगारांनी रात्रीपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.

सर्व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल 

टोल प्लाझा कंपनीने कर्मचाऱ्यांच्या या वागणुकी विरुद्ध वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून येथील कर्मचाऱ्यांना टोल प्लाझावरून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच टोल प्लाझा बंद केल्याप्रकरणी वाशिम ग्रामीण पोलिसांनी काम बंद करणाऱ्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल केले असून नियमबाह्य पद्धतीने आंदोलन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : शरीरातून येतोय घामाचा वास? मग महागडं परम्युम कशाला सोप्या उपायांनी मिळवा नैसर्गिक फ्रेशनेस

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपके कपिल सिब्बलांच्या भेटीला

हिरव्या मुगापासून बनवा खमंग लाडू; घरच्या घरी सोपी रेसिपी

Credit Card Rent Payment : क्रेडिट कार्डने घरभाडे भरणे फायदेशीर की तोट्याचे? जाणून घ्या

पावसाळ्यात बनवा अळुच्या पानांची कुरकुरीत भाजी

SCROLL FOR NEXT