Amravati CCI Center : सीसीआयमार्फत कापूस खरेदी बंद; शेकडो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात

Amravati News : भाव वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला होता. मात्र भाव होत नव्हती. दरम्यान शासनाने कापसाला हमीभाव देत सीसीआय खरेदी केंद्र सुरु केले
Amravati News
Amravati NewsSaam tv
Published On

अमर घटारे 

अमरावती : भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला होता. कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी शासनाने सीसीआय खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र सीसीआय मार्फत होणारी कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांच्या घरात शेकडो क्विंटल कापूस तसाच पडून असल्याचे चित्र आहे. यात प्रति क्विंटल ५०० ते ६०० रुपयाचे नुकसान होणार असल्याची शक्यता आहे. 

शेतकऱ्याने कापूस काढणीला सुरवात केल्यानंतर कापसाचे दर कमीच राहिले. भाव वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला होता. मात्र भाव होत नव्हती. दरम्यान शासनाने कापसाला हमीभाव देत सीसीआय खरेदी केंद्र सुरु केले होते. याठिकाणी कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करावयाची होती. यानंतर कापूस खरेदी करण्यास सुरवात करण्यात आली. 

Amravati News
Farmer Success Story : आयटी इंजिनिअर तरुणाची कमाल; टरबूज, मिरची मिश्र शेतीतून लाखो रुपयांचा नफा

खरेदी केली बंद 
दरम्यान १५ मार्चपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी शासकीय कापूस खरेदीसाठी नोंदणी केली. त्या शेतकऱ्यांचा कापूस सीसीआयने खरेदी केला. मात्र अजूनही शेकडो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. तर काही शेतकऱ्यांचा कापूस अजूनही वेचणी सुरू असताना सुद्धा शासनाची कापूस खरेदी बंद पडल्याने कापूस उत्पादक शेतकरी मोठा अडचणीत आला आहे.  

Amravati News
Sakri Water Crisis : उन्हाच्या तीव्र झळांमध्ये पाण्यासाठी वणवण; साक्री तालुक्यातील भीषण चित्र

शेतकऱ्यांचे होणार नुकसान 

शासनाच्या सीसीआय मार्फत होणाऱ्या कापूस खरेदीचा दर ७ हजार ४६१ ते ७ हजार ६०० रुपयांपर्यंत मिळत होता. तर अमरावती जिल्ह्यात खुल्या बाजारात हा दर ६ हजार ८०० ते ७ हजार रुपयेपर्यंत मिळत असल्याने प्रतिक्विंटल कापसामागे 500 ते 600 रुपयाचं नुकसान कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा होत आहे.त्यामुळे शासनाने तात्काळ कापूस खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com