Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim News: जीवंत आजीला तलाठ्याने दाखविले मृत; वर्षभरापासून श्रावण बाळ योजनेची पेन्शन बंद

जीवंत आजीला तलाठ्याने दाखविले मृत; श्रावण बाळ योजनेची पेन्शन बंद

साम टिव्ही ब्युरो

मनोज जयस्वाल

वाशिम : वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील रत्नप्रभाबाई रामराव देशमुख (वय ८५) या जीवंत आजीबाईचा मृत असल्याचा दाखला तलाठ्याने (Washim) तहसिलदारांकडे दिला. यामुळे जानेवारी २०२३ पासून त्यांची श्रावण बाळ योजनेची पेन्शन बंद झाली आहे. दरम्यान तलाठ्याच्या (Bank) चुकीचा फटका आजीबाईला बसला असून, किमान पेन्शन तरी सुरू करावी अशी आर्त हाक आजीबाईने दिली आहे. (Breaking Marathi News)

वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील रत्नप्रभाबाई रामराव देशमुख (वय ८५) या आजीबाईला सन २००५ मध्ये मानोरा तहसील कार्यालयातून श्रावण बाळ योजने अंतर्गत पेन्शन लागू करण्यात आली. घरात एकटी महिला, कमविता कोणी नाही, वय जास्त झाल्याने मजुरीचे काम होत नसल्याने पेन्शन योजनेचा मोठा आधार मिळतो. रत्नप्रभाबाई देशमुख या जून महिन्यात बँकेत पेन्शनचे पैसे काढण्यासाठी गेल्या असता बँकेकडून पेन्शन जमा झाली नाही असे उत्तर मिळाले.

वर्षभरापुर्वी मृत झाल्‍याचा अहवाल

पेन्शनबाबत नेमकी काय अडचण आली. याची विचारणा करण्यासाठी त्या नातेवाईकासह तहसिल कार्यालयात गेल्या असता तलाठी सागर चौधरी यांनी या महिलेचा मृत्यू झाला असा अहवाल २९ जुलै २०२२ रोजी कार्यालयास दिल्याने पेन्शन बंद झाल्याचे उत्तर ऐकून रत्नप्रभाबाई व नातेवाईकांना धक्काच बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीडमध्ये घरगुती वाद टोकाला; भररस्त्यावर तरूणाच्या डोक्यात कोयता हाणला, मेंदूचा चेंदामेंदा झाला

War 2 VS Coolie : रजनीकांत यांच्या 'कुली'ची पहिल्या आठवड्यात छप्परफाड कमाई, 'वॉर 2' लवकरच गाठणार 200 कोटींचा टप्पा

Maharashtra Live News Update : राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये पाऊण तास चर्चा

Today Gold Rate: १० तोळा सोन्याचे दर ६००० रुपयांनी वाढले; वाचा २२ आणि २४ कॅरेटचे दर

Real Money Gaming: ऑनलाइन गेमिंगवर मोठा बदल! सरकार Real Money Gamesवर बंदी आणण्याच्या तयारीत, नेमका प्रकार काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT