Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim News : महंत जितेंद्र महाराजांचा राज्यस्तरीय शासकीय समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा; नियुक्तीला झाले तिनच दिवस

Washim News : जितेंद्र महाराज हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असून त्यांनी भाजपकडे विधान परिषद किंवा कारंजा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली होती.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: वाशीमच्या पोहरादेवी येथील भक्तीधाम धर्मपिठाचे महंत जितेंद्र महाराज यांची शासनाने संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृध्दी योजने अंतर्गत राज्यस्तरीय समितीच्या अशासकीय सदस्य पदी तीन वर्षासाठी नियुक्ती केली होती. मात्र जितेंद्र महाराजांनी नियुक्तीनंतर अवघ्या तीनच दिवसात पदाचा राजीनामा दिला आहे.

जितेंद्र महाराज हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असून त्यांनी (BJP) भाजपकडे विधान परिषद किंवा कारंजा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली होती. आताही कारंजा विधानसभा मतदारसंघावर आपला दावा कायम असून तिथून त्यांना उमेदवारी द्यावी. दुसऱ्याला उमेदवारी द्यायची झाल्यास बंजारा समाजातील कार्यकर्त्यालाच संधी द्यावी; अशीही मागणी महंत जितेंद्र महाराज यांनी भाजपकडे केली आहे.

धार्मिक अधिष्ठानाच्या कामाचे कारण 
जितेंद्र महाराज यांनी या आधी राज्यपाल नियुक्त आमदारामध्ये आपली नियुक्ती करावी; अशी मागणी भाजपकडे केली होती. मात्र त्या जागेवर दुसऱ्याला संधी मिळाल्याने महाराजांनी भाजपवर नाराजी दर्शवत राजीनामा दिल्याची चर्चा होती. यासंदर्भात जितेंद्र महाराज यांनी आता स्वतः स्पष्टीकरण दिले असून आपण नाराज नाही. मात्र, धार्मिक अधिष्ठानाच्या कामामुळे आपल्याला समितीच्या कामासाठी वेळ मिळणार नाही त्यामुळं राजीनामा दिला असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भुजबळ-वडेट्टीवार यांच्यातच वाद होत असतील तर ओबीसींनी कुणाकडे पाहायचं - नवनाथ वाघमारे

Diwali Car Offers: दिवाळी बंपर ऑफर; 'या' टॉप सेडान कारवर तब्बल २.२५ लाखांची सूट

Dog Attack : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाचा मुलावर हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Abhyang Snan Time: दिवाळी पहाटच्या दिवशी 'अभ्यंगस्नान' कधी करावे? वाचा शुभ मूहूर्त

Diwali 2025 : आली दिवाळी! फटाके फोडताना 'ही' घ्या काळजी, नाहीतर...

SCROLL FOR NEXT