Girl Death saam tv
महाराष्ट्र

चुकीच्या पोलिओ डोसमुळे बालिकेचा मृत्यू; वडिलांकडून तक्रार दाखल

चुकीच्या पोलिओ डोसमुळे बालिकेचा मृत्यू; वडिलांकडून तक्रार दाखल

गजानन भोयर

वाशिम : पोलिओचा चुकीच्या पद्धतीने डोस दिल्यामुळे दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगरूळपीर तालुक्यातील लिंबी येथे घडली. दरम्यान श्रुष्टी आडे या बलिकेला ८ फेब्रुवारी पोलिओचा डोस (Polio Dose) दिला. त्यानंतर श्रुष्टीचा मेंदू बंद झाल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी अकोला (Akola) येथे दाखल केले. मात्र १५ फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला. (washim Girl dies due to wrong polio dose Filed a complaint from the father)

पोलिओचा डोस घेण्याआधी श्रुष्टीची तबेत ठणठणीत होती. पोलिओचा डोस देण्याआधी चार इंजेक्शन दिले आणि नंतर पोलिओचा डोस दिल्यानंतर तिची तब्‍बेत बिघडली. तिला वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला. त्यामुळे वडील केशव आडे यांनी संबंधित नर्स आणि डॉक्टरांच्या (Doctor) हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे. हा प्रकार संतापजनक असुन, असा प्रकार कुणासोबत घडू नये म्हणून या विरोधात मुलीचे वडील केशव आडे यांनी मुलीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या महिला नर्स आणि सहयोगी डॉक्टर विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी; अशी तक्रार संबंधित विभागाकडे केली आहे.

डॉक्‍टरांचे म्‍हणणे डोसमुळ मृत्‍यू नाही

यासंदर्भात डॉक्टरांना विचारले असता पोलिओचा डोस हा शासनाच्या नियमानुसार दिल्या जातो. श्रुष्टीला पोलिओचा डोस ८ तारखेला दिला. गावात तिच्यासोबत दुसऱ्याही मुलांना दिला. मात्र दुसऱ्या मुलांना काहीच इन्फेक्शन झाले नाही. त्यामुळे हा मृत्यू पोलिओचा डोसमुळे झाला नसावा; असे जिल्हा साथरोग व माता बालसंगोपन अधिकारी डॉ. मोबिन खान यांनी सांगितले.

मुलीचा जीव परत येईल का?

पोलिओसारखे आजार होऊन भविष्यात अपंगत्व येऊ नये, यासाठी शासनाकडून दरवर्षी पोलिओचे दोन बुंद जिंदगीचे दिल्या जातात. मात्र नर्स आणि सहयोगी डॉक्टरच्या चुकीच्या पद्धतीने दिलेल्या पोलिओचा डोसमुळे दोन महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यु झाला आहे. आता आरोग्य विभाग चौकशी करून दोषींवर कारवाई करेल; ही मात्र श्रुष्टीचा गेलेला जीव परत येईल का? असा सवाल विचारल्या जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नवाब मलिक रिंगणात, महायुतीत वाद; भाजप प्रचार करणार नाही, आशिष शेलारांचं वक्तव्य

Sanam Kapoor Story: गडगंज पगाराच्या नोकरीला रामराम, १२० स्क्वेअरफूटमध्ये सुरुवात, आता हजारो कोटींचा मालक, सक्सेस स्टोरी वाचाच

Sharad Pawar News: शरद पवारांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य; काकांकडून पुतण्याच्या कौतुकाचं गूढ काय?

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत भाजपकडून ४० जणांची हकालपट्टी, बंडखोरांना दाखवला घरचा रस्ता!

Matru Vandana Yojana: गर्भवती महिलांना मिळतात ६००० रुपये; केंद्राची मातृत्व वंदना योजना नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT