Washim Accident Saam tv
महाराष्ट्र

Washim Accident : राज्यात पुन्हा 'हिट अँड रन'; भीषण अपघातात बापलेकीचा जागीच मृत्यू, पत्नी जखमी

Washim News : अंबादास जावळे पत्नी आणि १० वर्षीय मुली सोबत बाईकने कारंजा येथून धाकली किनखेड येथे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, मुरंबी फाट्याजवळ एका अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशिम
: दुचाकीने घराकडे निघालेल्या परिवारावर काळाने झडप घातली आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा- शेलुबाजार मार्गावर मुरंबी फाट्याजवळ दुपारच्या सुमारास दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बाप- लेकीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पत्नी जखमी झाली आहे. जखमी महिलेला लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

वाशिम जिल्ह्यातील कारंजा- शेलूबाजार मार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अंबादास जावळे व त्यांची दहा वर्षाची मुलगी आरती जावळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान अंबादास जावळे हे पत्नी आणि १० वर्षीय मुली यांना सोबत घेऊन मोपेड बाईकने कारंजा येथून धाकली किनखेड येथे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, मुरंबी फाट्याजवळ एका अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. 

दोघांचा जागीच मृत्यू 

ट्रकने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तिघेजण फेकले गेले. यामध्ये अपघातात अंबादास जावळे (वय ४५) आणि त्यांची मुलगी आरती जावळे (वय १०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी उषा जावळे ह्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्यांनी गर्दी केली होती. तर जखमी उषा जावळे यांना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

ट्रक चालक फरार 

दरम्यान सदर अपघात घडल्यानंतर ट्रक चालक वाहनासह पसार झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची नोंद केली आहे. तर फरार झालेल्या अज्ञात ट्रक चालकाचा शोध सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT