Washim Weather Forecast Saam tv
महाराष्ट्र

Washim Weather News: एप्रिलअखेर वाशीम जिल्ह्यात तापमान ४० अंशाच्या पार!

Washim Temperature News: एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे वाशीम जिल्ह्यातील तापमानात काहीशी घसरण झाली होती.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्यंतरी राज्यातील बहुतांश शहरातील (Temperature) तापमान ४२ अंशाच्या पार गेले होते. मात्र अवकाळी पावसामुळे पारा खाली आला होता. मात्र आता एप्रिल महिन्याच्या अखेरीला पारा पुन्हा वर गेला असून (Washim) वाशीम जिल्ह्यातील तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे. 

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला अवकाळी (Rain) पाऊस व वादळी वाऱ्यामुळे वाशीम जिल्ह्यातील तापमानात काहीशी घसरण झाली होती. यामुळे उन्हाच्या तिव्रतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र एप्रिल अखेर वाशीम जिल्ह्यातील तापमानात पुन्हा वाढ झाली असून दुपारचे सरासरी तापमान ४० डिग्री सेल्सियसपर्यंत वाढत आहे. तर रात्री सरासरी तापमानाचा पारा ३० पर्यंत पोहचत आहे.

वैशाख अजून बाकी
मे महिना अजून सुरूही झाला नसला तरी सुद्धा (High Temperature) तापमानात झालेल्या प्रचंड वाढ झाले. आता वैशाख महिन्याची सुरवात होणार असून या महिन्यात तापमानाची तीव्रता अधिक असते. याची दाहकता सहन करण्यापूर्वीच जिल्ह्यातील नागरिकांना शीतपेयांचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान, उष्ण लाटेपासुन स्वतःचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT