Risod Police Saam tv
महाराष्ट्र

Risod Police : दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघेजण ताब्यात, आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Washim Risod News : वाशिमच्या रिसोड पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. दाखल तक्रारीनंतर रिसोड पोलिसांनी तांत्रिक व आधूनिक पध्दतीने तपास सुरु केला

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. यात वाशीम जिल्ह्यातील रिसोड आणि बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. या टोळीकडून तब्बल १२ दुचाकी जप्त करत तब्बल आठ लाख रुपयांचा मुद्देमाल या चोरट्याकडून हस्तगत केला आहे. सदरची कारवाई  वाशिमच्या रिसोड पोलिसांनी केली आहे. 

वाशिमच्या रिसोड पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. या प्रकरणी दाखल तक्रारीनंतर रिसोड पोलिसांनी तांत्रिक व आधूनिक पध्दतीने तपास सुरु केला. यात दोन जणांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. यामुळे दुचाकी चोरी करणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. दोघांना अटक करण्यात आली असून रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांचा तपास सुरु आहे. 

सव्वाआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 

रिसोड पोलिसांनी मयुर प्रविण नवले (वय २१) व गजानन उर्फ गणेश बळीराम गायकवाड (वय १८) या दोघांना ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान दोन्ही संशयीत आरोपीकडून एकूण १२ दुचाकीश ८ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आणखी तपास सुरु आहे.  

नाशिकमध्ये मोटरसायकल चोरांचं रॅकेट उध्वस्त
नाशिक शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या प्रकरणी दाखल तक्रारींवरून उपनगर पोलिसांनी चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. चोरीच्या नऊ दुचाकी जप्त केल्या असून मोटरसायकल चोरी प्रकरणी एका विधी संघर्षित बालकाला अटक करण्यात आली आहे. तर एक साथीदार फरार झाला आहे. विधी संघर्ष बालक स्वतःच्या काका समवेत मोटर सायकलची चोरी  करायचा. त्यांनी नाशिकच्या उपनगर, इंदिरानगर, मुंबई नाका आणि ग्रामीण भागातून मोटर सायकलची चोरी केल्याची कबुली दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Gochar: आजपासून 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम; बुध करणार शुक्राच्या तूळ राशी एन्ट्री

Todays Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींनी तब्येत जपणं आज गरजेचे आहे; वाचा राशीभविष्य

Chaitanyanand Swami: विद्यार्थिनींना धमकावून चैतन्यानंद सरस्वतीकडे पाठवायच्या, इन्स्टिट्यूटच्या ३ महिला अधिकाऱ्यांना अटक

Shocking : मोबाईलवर गेम खेळू नको, बहीण ओरडली; रागाच्या भरात भावाचा टोकाचा निर्णय

हैदराबाद विरुद्ध ब्रिटिश गॅझेटियरवरुन वाद?मुंडेंच्या टीकेला जरांगेंचं वादग्रस्त उत्तर

SCROLL FOR NEXT