Washim Accident Saam tv
महाराष्ट्र

Washim Accident : धावत्या ट्रकचा टायर निघाल्याने घडला अनर्थ; एकाचा मृत्यू, एक जखमी

Washim News : धावत्या ट्रकचे दोन चाकं अचानक निखळून त्यांच्या अंगावर जोरदार धडकले. यामुळे ते खाली कोसळले

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : महामार्गाने जात असलेल्या धावत्या ट्रकचा टायर अचानक निखळून बाहेर आला. हा निघालेला टायर वेगाने पुढे जाऊन उभ्या असलेल्या (Accident) व्यक्तीच्या अंगावर गेल्याने यात एकाचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाल्याची घटना (Washim) वाशिम मालेगाव तालुक्यातील अंधार सांवंगी फाट्यावर घडली आहे. (Live Marathi News)

शेख मनसार शेख रोशन हे लग्नाला जाण्यासाठी मेडशी येथील अंधार सावंगी बसस्थानकावर गाडीची वाट पाहत उभे होते. याच दरम्यान (Malegaon) मालेगाववरून अकोल्याकडे जाणारा १४ टायरचा ट्रक असल्याने दोन चाक ट्रक सोडून निघून गेले. धावत्या ट्रकचे दोन चाकं अचानक निखळून त्यांच्या अंगावर जोरदार धडकले. यामुळे ते खाली कोसळले. यानंतर त्यांना मेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टायर निघाल्याबाबत ट्रक चालक अनभिन्न 

सदरच्या घटनेत जुम्मा छोटू गारवे हे जखमी झाले असून एका उभ्या कारचे सुद्धा नुकसान झाले आहे. टायर निघाल्याचे ट्रक चालकाला त्याची भणक सुद्धा लागली नाही. घटनास्थळी उभ्या असलेल्या नागरिकांनी ट्रक थांबवत घडलेली घटना चालकाच्या निदर्शनास आणून दिली. मृतकाचे नातेवाईक शेख जावेद शेख मंसार यांनी मेडशी (Police) पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक राकेश जाखर (रा. सलूनडिया जि. बिकानेर) यांच्या विरुध्द तक्रार दाखल केली असून पुढील तपास मेडशी पोलीस चौकीचे जमादार राज बंगाले करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Skin Care : वय कमी, पण चेहऱ्यावरून दिसता म्हातारे; रात्रीच्या ३ चुका ठरताहेत कारणीभूत

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

Pithla Bhakri Recipe: थंडीत गरमागरम जेवणासाठी झटपट बनवा झणझणीत पिठलं-भाकरी, वाचा रेसिपी

Famous Director Death: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; बाथरुममध्ये पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महिलांना ४० हजार रुपये मिळणार? सरकारने केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT