Washim St Bus And Bike Accident Saam Tv
महाराष्ट्र

Washim Accident: एसटी बस -दुचाकीची समोरासमोर धडक, २ जण ठार

Washim St Bus And Bike Accident: वाशिमकडून हिंगोलीकडे जाणाऱ्या भरधाव एसटी बसने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला.

Priya More

मनोज जैस्वाल, वाशिम

वाशिममध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना घडली आहे. एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये एसटी बसने दुचाकीला ५० फुटापर्यंत फरफटत नेले. अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांना रास्तारोको आंदोलन केले. या अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमकडून हिंगोलीकडे जाणाऱ्या भरधाव एसटी बसने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये एक महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या व्यक्तीला रुग्णालयामध्ये घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला.

हा अपघात इतका भीषण होता की एसटी बसने दुचाकीला ५० फूटांपर्यंत फरफटत नेले. अपघाताची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. दोन्ही वाहनं रस्त्याच्या बाजूला काढण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

या अपघातामुळे नागरिक संतप्त झाले. संतप्त नागरिकांनी काही काळ अकोला - हैद्राबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. अपघातामध्ये मृत्यू झालेले दोघेही वाशीमच्या उकळी पेन गावचे रहिवासी अल्याची माहिती मिळतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Rule Change : आरबीआयनं नियम बदलले, ऑटो-पेमेंटची ती अट कायमची बंद, वाचा सविस्तर

FIR against minister: गृहमंत्र्यांवर FIR दाखल करा, कोर्टाचे आदेश; कबड्डी सामन्यात लावली होती ५०० रुपयांची पैज

Health Care: सतत थकवा, अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होतोय? मग शरीरात असू शकते ‘ही’ कमतरता; वेळीच व्हा सावधान

Badlapur News: नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा; राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये हमरीतुमरी

Maharashtra News Live Update: नारा नदी पुलाखाली आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह

SCROLL FOR NEXT