Babulgaon 14 year old Aniket Sadhude Kidnapping and killed Saam Tv News
महाराष्ट्र

शेतकरी माय-बापाच्या १४ वर्षीय लेकराचं अपहरण, अखेर ९ दिवसांनी लागला तपास, पण...; आई-वडिलांचा आक्रोश

Washim Aniket Sadhude Kidnapping and Murder : वाशिममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बाभूळगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील १४ वर्षीय मुलाचं अपहरण झालं होतं. घटनेच्या ९व्या दिवशी म्हणजे आज त्याचा मृतदेह सापडला आहे.

Prashant Patil

वाशिम : वाशिमच्या बाभूळगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील १४ वर्षीय अल्पवयीन अनिकेत साधुडेच्या अपहरणाच्या प्रकरणाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अपहणर झालेल्या अनिकेतचा मृतदेह सापडला आहे. वाशिम-पुसद मार्गावर अनिकेतचा मृतदेह सापडल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. अनिकेतचं काही दिवसांपूर्वी ६० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत अपहरण करण्यात आलं होतं. १२ मार्च रोजी अनिकेतचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या शोधासाळी तपासाची चक्रे गतिमान करत शोध सुरु केला. तरीही अनिकेत काही सापडला नाही, त्याच्या आई-वडिलांना मोठी चिंता लागली होती. दोन्हीही आपल्या लेकरुच्या वाटेकडे नजर लावून बसले होते. पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत चार जिल्ह्यातील १२ पोलीस पथकं कामाला लावली. अखेर आज ९व्या दिवशी लेकराचा मृतदेह सापडल्याने आई-वडिलांसह कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या बाभूळगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील १४ वर्षीय अनिकेत साधुडे याचं १२ मार्चला अपहरण झालं होतं. त्यानंतर त्याचा तपास केला असता तो कुठेही आढळून आला नाही. धक्कादायक बाब म्हणजे, अपहरणाच्या घटनेला ९ दिवस उलटूनही पोराचा थांगपत्ता न लागल्याने वडिलांचे डोळे सतत पाणावले होते, तर आईचे डोळे लेकराच्या वाटेकडून नजर लावून बसले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती आणि पोलिसांनी अनिकेतचा शोध घेत असताना चार जिल्ह्यातील १२ पोलीस पथके शोधकार्यात लावली होती.

दरम्यान, या तपासात अनिकेत साधुडे याचं ६० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण होऊन बराच कालावधी उलटून सुद्धा पोलिसांना त्या पत्ता न लागल्याने अनिकेतच्या पालकांना मोठी चिंता लागली होती. आखेर आज शुक्रवारी म्हणजेच घटनेच्या ९व्या दिवशी अनिकेतचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून यातील आरोपींचाही शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Tourism: किल्ले-धबधब्यांपासून ब्रेक घ्या! पावसाळ्यात मुलांसोबत फिरण्यासाठी ‘ही’ ३ ठिकाणं बेस्ट

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

SCROLL FOR NEXT