Washim Crime : १४ वर्षीय मुलाचं अपहरण, ६० लाख रुपयांची मागणी; शेतकरी माय-बापाची नजर लेकरुच्या वाटेकडे

Washim Kidnapping 14 Year Old Boy : शेतकरी कुटुंबातील साधुडे यांनी काही महिन्यापूर्वी वाशिम पुसद मार्गावरील आपल्या शेतजमिनीची विक्री केली होती, त्यातून मोठी रक्कम साधुडे यांना मिळाली होती.
Washim 14 year old boy kidnapped
Washim 14 year old boy kidnappedSaam Tv News
Published On

वाशिम : वाशिमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ६० लाख रूपयांच्या खंडणीसाठी एका १४ वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील बाभूळगाव येथे घडली आहे. विशेष म्हणजे अपहरणाच्या घटनेला तब्बल ५ दिवस उलटूनही पोराचा थांगपत्ता न लागल्याने वडिलांचे डोळे पाणावले असून आईचे डोळे लेकराच्या वाटेकडे नजर लावून बसले आहेत.

या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत. वाशिमच्या बाभूळगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील १४ वर्षीय अल्पवयीन अनिकेत साधुडे याचं ६० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं आहे. अपहरण होऊन जवळपास ५ दिवस उलटूनही पोलिसांना अपहरणकर्त्यांचा थांगपत्ता न लागल्याने अनिकेतच्या पालकांना मोठी चिंता लागली आहे.

Washim 14 year old boy kidnapped
मोठी बातमी! पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, बसची अक्षरश: राख, पुलवामाची पुनरावृत्ती; पाकचे ९० जवान ठार

शेतकरी कुटुंबातील साधुडे यांनी काही महिन्यापूर्वी वाशिम पुसद मार्गावरील आपल्या शेतजमिनीची विक्री केली होती, त्यातून मोठी रक्कम साधुडे यांना मिळाली होती. साधुडे कुटुंबीयांकडे शेतजमिनीतून मिळालेली मोठी रक्कम असल्याची माहिती अपहरणकर्त्यांना होती. त्यातूनच या पैशावर डोळा ठेऊन साधुडे यांचा १४ वर्षीय मुलगा अनिकेतचे अपहरण करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण, अपहरणानंतर अनिकेतच्या घराबाहेर एका बंद लिफाफ्यात ५ पानी पत्रात खंडणीची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com