Washim Accident Saam tv
महाराष्ट्र

Washim Accident : दुचाकी बसचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोन महिला गंभीर जखमी

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: वाशिमच्या शिरपूर-रिसोड मार्गावर समोर येणाऱ्या बसचा अंदाज चुकल्याने दुचाकीची जोरदार धडक झाली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एकाच जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाशीम (Washim) जिल्ह्यातील शिरपूर-रिसोड मार्गावर हा भीषण अपघात दुपारच्या सुमारास घडला. यात दुचाकीवरून एक पुरुष व दोन महिला शेतातून काम करून घरी येत होते. त्या दरम्यान एकांबा फाट्यावर वळण रस्तावर राष्ट्रीय महामार्गावर रिसोड आगाराची बस रिसोडकडून शिरपूर बसस्थानकाकडे जात होती. त्या दरम्यान दुचाकीस्वार वळण रस्ता क्रॉस करत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमुळे दुचाकीस्वारास बस दिसली नाही. एसटी चालकास दुचाकी दिसली नाही. त्यामुळे दुचाकी व एसटीची समोरासमोर (Accident) धडक होऊन भीषण अपघात झाला. 

या अपघातात भिका चंदू रैघीवाले हे गंभीर जखमी झाले. त्यांना अकोला येथे रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला आहे. तर लछमी भिका रैघीवाले व नसीमा रैघीवाले या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर अकोला येथे रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बस पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली असून एसटी बस चालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरणाची फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alum Termeric Benefits: हळद-तुरटीचा फेस पॅक वापरा, पिंपल्सच्या समस्या होतील दूर...

Maharashtra Politics: भाजपला दे धक्का! हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी; आणखी धक्के बसणार, शरद पवारांचा महायुतीला इशारा

Naxalists killed in Chhattisgarh : नक्षलवादी-पोलिसांमध्ये धुमश्चक्री! 30 नक्षल्यांचा सुपडासाफ, VIDEO

Maharashtra News Live Updates: शरद पवार यांच्या उपस्थित होणार हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा नवा पत्ता, थाटलं नवं कार्यालय, छत्रपती भवनातून चालणार जरांगेंचा कारभार

SCROLL FOR NEXT