WASHIM ACB TRAPS IRRIGATION ENGINEER HEMANT CHAVAN WHILE ACCEPTING BRIBE IN PLOT ALLOCATION CASE  Saam Tv
महाराष्ट्र

Bribe Case : धक्कादायक! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा सापडला जाळ्यात

Wachim Bribe Case Update News : वाशिममध्ये एसीबीची मोठी कारवाई. लघु पाटबंधारे विभागाचे इंजिनियर हेमंत चव्हाणला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • वाशिम येथील लघु पाटबंधारे विभागाचे इंजिनियर हेमंत चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

  • प्लॉट वाटपाचा प्रस्ताव पुढे पाठवण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितली

  • ५ हजार रुपये स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ कारवाई केले

  • प्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू

वाशीममधून मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागातील इंजिनियर हेमंत दगाजी चव्हाणला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. कौलखेड येथील पुनर्वसित गावातील उरलेले प्लॉट वाटपाचा प्रस्ताव पुढे पाठवण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली असल्याची माहिती आहे. याप्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कौलखेड येथील पुनर्वसित गावातील काही प्लॉट वाटपाचा प्रस्ताव संबंधित कार्यालयात खोळंबलेला होता. हा प्रस्ताव पुढे वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी इंजिनियर हेमंत चव्हाण यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचे सांगितले जात आहे. मात्र, लाचेची रक्कम मागितल्याप्रकरणी तक्रारदाराने थेट वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल झाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी माहितीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्याकडून लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. दरम्यान, तक्रारदार आणि संबंधित अधिकाऱ्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर ३० हजार रुपयांच्या मागणीवरून २० हजार रुपयांमध्ये तडजोड झाल्याचेही समोर आले.

ठरल्याप्रमाणे या रकमेतील पहिला हप्ता म्हणून ५ हजार रुपये देण्यात येणार होते. एसीबीच्या पथकाने संपूर्ण व्यवहारावर लक्ष ठेवत सापळा रचला. तक्रारदाराने ठरलेल्या ठिकाणी ५ हजार रुपयांची रक्कम दिल्यानंतर हेमंत चव्हाणने ती स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ वरून २० लाख करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी, सुनेत्रा पवारांची घेतली भेट

PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Nepal Flood: महापुरात घरं वाहून नेली, पण निष्ठा नाही! मालकाच्या प्रतीक्षेत कुत्रे ढिगाऱ्याजवळ ठाण मांडून

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

जमिनीसाठी आई-बापाच्या जीवावर उठले, निर्लज्ज मुलांची आई-वडिलांना भररस्त्यात मारहाण

SCROLL FOR NEXT