Rashmi Thackeray x
महाराष्ट्र

Shivsena : रश्मी ठाकरेंमुळे शिवसेना फुटली? मातोश्रीच्या नव्या 'माँसाहेब'? शिवसेनेचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हाती?

Rashmi Thackeray : शिवसेनेच्या फुटीला जबाबदार कोण? याबद्दल गोगावलेंनी नवा दावा केला. ज्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. त्यामुळे मातोश्रीवर नव्या माँसाहेबांचा आदेश चालतो का? असा सवाल उपस्थित झालाय. नेमकं प्रकरण काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Yash Shirke

सुप्रिम म्हसकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

शिवसेनेच्या फुटीची सल काही केल्या शिवसैनिकांच्या मनातून जात नाही. त्यामुळे वारंवार शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून शिवसेनेच्या फुटीबद्दल वेगवेगळे दावे केले जातात. अशातच आता शिंदेसेनेचे कोकणातील शिलेदार मंत्री भरत गोगावले यांनी फुटीच्या कारणाची पुन्हा एकदा उजळणी केली. त्यात आतापर्यंत कधीही पुढे न आलेला नवा दावा केला गेलाय. बाळासाहेबांनी कधीही मॉ साहेबांचं ऐकलं नाही, असं म्हणत गोगावलेंनी शिवसेनेच्या फुटीला कोण कारणीभूत आहे त्यावर भाष्य केलयं. त्यामुळे आता मातोश्रीवर नव्या मॉ साहेबांचा आदेश चालतो का? असा सवाल उपस्थित झालाय. गोगावलेंनी नेमकं काय म्हणाले पाहूयात...

भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरेंवर नेमके काय आरोप केले... पाहूयात..

शिवसेनेच्या फुटीमागे वहिनींचा हात?

- रश्मी ठाकरेंमुळे शिवसेनेत उभी फुट पडली

- रश्मी ठाकरेंकडून आदित्य ठाकरेंना मंत्रीपद देण्याचा हट्ट

- रश्मी ठाकरेंमुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत

- तिकिट वाटपात रश्मी ठाकरेंचा हस्तक्षेप

- राणे, भुजबळ आणि राज ठाकरेंच्या मनोमिलनात रश्मी ठाकरेंचा खोडा

दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरु झाल्यानंतर नितेश राणेंनी असाच आरोप केला होता. उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी रश्मी ठाकरेंची परवानगी घ्यावी लागेल, असा दावा नितेश राणेंनी केला होता. दरम्यान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी गोगावलेंच्या दाव्याला उत्तर देणं टाळलंय.

आजवर रश्मी ठाकरेंवर अनेकदा आरोप झाले पण ठाकरेंनी कधीच या मातोश्रीतील गोष्टी बाहेर येऊ दिल्या नाहीत. आणि आताही ठाकरेंच्या कधीकाळच्या शिलेदारांनी थेट मातोश्रीच्या या नव्या मॉसाहेबच्याच हातीच युती आघाडीचा रिमोट कंट्रोल असल्याचं म्हटल्यानं आता तरी रश्मी ठाकरे या आरोपांना उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT