wardha crime news  saam tv
महाराष्ट्र

Wardha| 'माझ्यासोबत लग्न कर, अन्यथा...'; तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची पोलिसात तक्रार

युवतीला रस्त्यात अडवून तू माझ्याशी लग्न न कर, अन्यथा तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकी देत युवतीचा विनयभंग केल्याची घटना वर्धा शहरात घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

wardha Crime News : वर्धा (Wardha) शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. युवतीला रस्त्यात अडवून तू माझ्याशी लग्न न कर, अन्यथा तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकी देत युवतीचा विनयभंग केल्याची घटना वर्धा शहरात घडली आहे. सदर घटना वर्धा शहरातील पोस्ट ऑफीस जवळील झाँशी राणी चौकात घडली आहे. याप्रकरणी युवतीने वर्धा शहर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय युवतीची दोन वर्षांपूर्वी गांधीनगर परिसरात शिकवणीमध्ये मंथन गहरोले याच्याशी ओळख झाली होती. तेव्हापासून दोघेही एकमेकांना भेटत होते. एकत्र शिकवणीमुळे दोघांमध्ये मैत्री झाली होती. त्यामुळे दोघे मोबाईलवर चॅटिंग करु लागले.

मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून युवतीने त्याच्याशी बोलणे बंद केल्याने मंथन हा नेहमी युवतीचा पाठलाग करायचा. तू माझ्यासोबत बोलत का नाही ? माझ्याशी लग्न कर, नाही तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून पोलिसात मंथनविरोधात तक्रार दाखल केली आहे.

नेमकं काय घडलं ?

वर्धा शहरातील तरुणीची शिकवणीमध्ये मंथनसोबत भेट झाली. शिकवणीमध्ये मैत्री झाल्यामुळे युवती मोबाईलवर चॅटिंग करायचे. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून युवती बोलत नसल्याने मंथनने तरुणीचा पाठलाग करणे सुरु केले. मंथनने महाविद्यालयातून घरी जात असताना पोस्ट ऑफीस चौकात तिला रस्त्यात अडवून असभ्य वर्तन करीत पाठलाग केला. त्यास हटकले असता फोटो व्हायरल करण्याची पुन्हा धमकी दिली. अखेर युवतीने सततच्या त्रासाला कंटाळून याबाबतची तक्रार शहर पोलिसात दिली. पुढील तपास वर्धा शहर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजपला धक्का! आमदाराचे काका शिंदे गटाच्या वाटेवर, एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार

horrific accident : स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात दुर्घटना; शाळेचं छत कोसळलं, एका मुलीचा मृत्यू

PF Withdrawal : नोकरी करतानाही पीएफचे पैसे काढता येतात! नियम आणि अटी जाणून घ्या

WhatsApp Banned: 'या' चुका आताच टाळा, नाहीतर तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट होईल बॅन

Maharashtra Live Update: शक्तीपीठासाठी मोजणी झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू - राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT