Maharashtra Rain Latest Update:  Saamtv
महाराष्ट्र

Wardha News: हृदयद्रावक! मुसळधार पावसाने पूल खचला, आजोबा अन् नात वाहून गेले; वर्ध्यातील घटना

Maharashtra Rain Latest Update: घटनेची माहिती मिळताच आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हाधिकारी व प्रशासनाला याची माहिती देत तात्काळ बचाव पथक घटनास्थळी रवाना करण्याच्या सूचना दिल्या.

Gangappa Pujari

चेतन व्यास| वर्धा, ता. १ सप्टेंबर २०२४

नाल्यावरील पूल अचानक खचल्याने आजोबा आणि नातं वाहून गेल्याची दुर्दैवी घटना वर्ध्या जिल्ह्यामध्ये घडली आहे. हिंगणघाट तालुक्याच्या चानकी येथील ही घटना असून याबाबत आमदार कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. ज्यानंतर जिल्हा प्रशासनाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. सध्या दोघांचाही शोध सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिंगणघाट तालुक्याच्या चानकी येथील नाल्यावरील पूल अचानक खचल्याने आजोबा आणि नातं वाहून गेल्याची घटना घडली आहे. कानगाव येथून बाजार करून परत चानकीला येत असताना ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हाधिकारी व प्रशासनाला याची माहिती देत तात्काळ बचाव पथक घटनास्थळी रवाना करण्याच्या सूचना दिल्या.

मिळालेल्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून दोघांचाही शोध सुरू आहे. लाला सुखदेव सुरपाम (वय 55 वर्ष ) व नायरा साठोणे (वय 9 वर्ष ) असं वाहून गेलेल्यांची नाव आहेत. सध्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी व महसूल विभागाचे कर्मचारी वाहून गेलेल्या दोघांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, शनिवारी संध्याकाळपासुन जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चानकी येथील नालाही दुभडी भरून वाहत आहे. या नाल्यावरील पूल यापूर्वीसुद्धा अतिवृष्टीने खचलेला होता मात्र त्याची डागडुजी करण्यात आली होती. परंतु आज आलेल्या पावसाने तो पुन्हा खचला आणि त्यात आजोबा आणि नातं वाहून गेले. या दुर्घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी 'मेक इन इंडिया'ची मोठी भूमिका - PM मोदी

SCROLL FOR NEXT