wardha saam tv
महाराष्ट्र

Wardha News : पुलगावात धावत्या कारमध्ये मुलीवर अत्याचार करणा-या युवकासह साथीदारास अटक

शाळा, महाविद्यालयासमोर पोलिसांची नेहमी गस्त असते. विद्यार्थ्यांना कोणीही त्रास किंवा छेड काढत असल्यास याची माहिती तात्काळ पुलगाव पोलिसांना द्यावी असे आवाहन पाेलिस दलाने केले आहे.

साम न्यूज नेटवर्क

- चेतन व्यास

Wardha Crime News : वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथे चक्क शाळेसमोरून चाकूचा धाक दाखवत एका तेरा वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेतील मुख्य संशयित आरोपी सुमेध मेश्राम (वय 24) तसेच त्याला सहकार्य करणारा वाहन चालक अक्षय गुल्हाणे (वय 28) यांना पुलगाव पोलिसांनी रात्री अटक (arrest) केली. पाेलिसांनी या गुन्ह्यातील एक चारचाकी वाहनही जप्त केले आहे.

या घटनेबाबतची मुलीनं पाेलिसांना दिलेली माहिती अशी : मी शाळे समोरील प्रवेशद्वाराजवळ थांबली हाेती. त्यावेळी सुमेध मेश्राम याने चाकूचा धाक दाखवून मला जबरदस्तीनं खेचत वाहनात बसवले. त्यानंतर वाहन चालकाने चारचाकी समोर नेली. मी आरडाओरड केला पण काचा बंद होत्या. सुमेधने माझ्यावर धावत्या कारमध्येच बळजबरी केली. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेची माहिती मी माझ्या आईला सांगितली. दरम्यान आईच्या तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी संशयितांविरुद्ध विविध कलमन्वये गुन्हा दाखल केला अशी माहिती शैलेश शेळके (पोलीस निरीक्षक, पुलगाव) यांनी दिली.

दरम्यान पुलगाव पोलिसांनी रात्री उशिरा घटनेतील मुख्य संशयित आरोपी सुमेध राजहंस मेश्राम ( राहणार, नागपूर फैल, पुलगाव) व त्याला मदत करणारा चारचाकी चालक अक्षय लक्ष्मणराव गुल्हाने (राहणार साबळे ले आउट, पुलगाव) या दाेघांना देवळीतून अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेलं चारचाकी वाहन सुद्धा जप्त करण्यात आले आहे.

आज या दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच त्यांची अधिक चाैकशी करता यावा यासाठी पोलीस कोठडीची मागणी न्यायालयात करणार असल्याची माहिती पुलगाव पोलीस निरीक्षक शैलेश शेळके यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. दरम्यान या घटनेनंतर पुलगाव शहरात एकच खळबळ उडाली असून पालकांनी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT