Wardha News Saam Tv
महाराष्ट्र

Wardha : आयकर अधिकारी असल्याचं सांगितलं, सर्च वॉरंट दाखवलं; वर्ध्यात प्राध्यपकाच्या घरात चोरट्यांची घुसखोरी

Wardha Crime News : वर्ध्यात बनावट आयकर अधिकारी बनून प्राचार्यांच्या घरी छापा टाकण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मात्र कुटुंबाच्या सतर्कतेमुळे त्यांचा भांडाफोड झाला. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • वर्ध्यात बनावट आयकर अधिकारी बनून तिघांनी प्राचार्यांच्या घरी छापा टाकला

  • आरोपींनी खोटे ओळखपत्र आणि बनावट सर्च वॉरंट दाखवले

  • कोंगरे कुटुंबाच्या सतर्कतेमुळे आरोपींचा डाव फसला

  • पोलिसांनी तिघांना अटक केली

चेतन व्यास, वर्धा

Fake Income Tax Raid In Wardha वर्ध्यात सिने स्टाईलने बनावट आयकर अधिकारी बनून तिघांनी एका घरी छापा टाकल्याची बातमी समोर आली आहे. एवढच नव्हे तर त्यांनी खोटे ओळखपत्र आणी घराचा सर्च वॉरंट सुद्धा तयार केला होता. मात्र कुटुंबियांच्या सतर्कतेमुळे या तिघांचे बिंग फुटले आणी त्यांना जेलची हवा खावी लागली. हा प्रकार वर्ध्याच्या रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत घडला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. किसन पर्वत, चेतन चव्हाण आणी अभिषेक विश्वकर्मा असा अटक केलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्याच्या रामनगर परिसरातील रहिवासी असलेले प्राचार्य चिंतामण कोंगरे यांच्या घरी हा प्रकार घडला आहे.कोंगरे यांच्या घरी तिघांनी अचानक प्रवेश करत आम्ही आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी केली. खोटे ओळखपत्र आणी बनावट सर्च वॉरंट सुद्धा यांनी कोंगरे यांना दाखवत घरातील तपासनीला सुरवात केली. मात्र या लुटारूंचा डाव अर्ध्यातच फसला.

कोंगरे हे एका प्राध्यापक संघटनेचे माजी पदाधिकारी असून त्यांचा मुलगा या संघटनेचा अध्यक्ष आहे. कोंगरे यांच्या घरात प्रवेश करताच तिघांनी तुम्ही बेनामी प्रॉपर्टी आणी मोठी रोख जमावल्याचा सांगत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर घरातील व्हिडीओसुद्धा काढायला सुरवात केली.

दरम्यान कोंगरे यांना तिघांच्या हालचालीवर शंका आली आणि त्यांनी आमचे हिशेब आमच्या सीएकडे असल्याच सांगितलं. यानंतर हे चोरटे अस्वस्थ झाले. कोंगरे यांच्या सतर्कतेने या तिघांना पोलिसांच्या हवाले करण्यात आलं. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

SCROLL FOR NEXT