Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : नऊशे रुपयांचा ड्रेस पडला एक लाखात; महिलेची ऑनलाईन शॉपिंगमधून फसवणूक

Wardha News : वर्धा जिल्ह्यातील म्हसाळा येथील राखी विठ्ठल रघाटाटे (वय ४६) यांनी एका ऑनलाइन साइट ओपन केल्यानंतर त्यांना एक ड्रेस पसंतीस पडला. ९९७ रुपयांचा ड्रेस त्यांनी ऑर्डर करत मागविला

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: मार्केटमध्ये न जाता ऑनलाईन शॉपिंग करण्याची सवय अनेकांना लागली आहे. यासाठी ऑनलाइन शाॅपिंग करण्यासाठीच्या अनेक साईट देखील आहेत. मात्र यातून काही साईट या फसव्या असून यातून फसवणूक केली जात असते. अशाच प्रकारे ऑनलाईन करणे महिलेला महागात पडले असून ९९७ रुपयांचा ड्रेस खरेदी केल्यानंतर १ लाख रुपयांत फसवणूक झाल्याचे प्रकार वर्धा येथे समोर आली आहे. 

वर्धा जिल्ह्यातील म्हसाळा येथील राखी विठ्ठल रघाटाटे (वय ४६) यांनी एका ऑनलाइन साइट ओपन केल्यानंतर त्यांना एक ड्रेस पसंतीस पडला. याची किंमत ९९७ रुपये इतकी होती. हा ९९७ रुपयांचा ड्रेस त्यांनी खरेदी केला होता. ऑर्डर केल्यानंतर ड्रेस घरी देखील आला होता. मात्र तो ड्रेस त्यांना आवडला नसल्याने परत केला. काही दिवसांनी पेड केलेली रक्कम परत मिळेल असे सांगण्यात आले होते. 

दरम्यान बराच दिवसांचा कालावधी गेल्यानंतर देखील याचा रिफंड त्यांना आला नाही. यामुळे महिलेने कस्टमर केअर क्रमांकावर कॉल केला असता त्यांनी व्हाॅट्सॲपवर संपर्क साधण्यास सांगितले. महिलेने व्हॉट्सॲपवर संपर्क केला असता त्यांनी गुगल पे, फोन पे क्रमांक तसेच पिनकोड मागितला. महिलेने ते दिले असता तिच्या व्हाॅट्सॲपवर एपीके फाइल पाठवून डाउनलोड करण्यास सांगितले.. 

फाईल डाउनलोड करताच अकाउंटमधून रक्कम गायब  

फाइल डाउनलोड करताच महिलेच्या बँक खात्यातून ८५ हजार आणि १५ हजार असे एकूण १ लाख रुपयांची कपात झाली. ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने याबाबतची तक्रार सायबर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून याचा तपास सुरु करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसेच्या दिपोत्सवाला जाताना ठाकरे बंधूंचा एकाच कारमधून प्रवास

Raj Thackeray :...अन् राज ठाकरेंनी स्वत: हाती घेतलं कारचं 'स्टीअरिंग', दीपोत्सवातील ठाकरे बंधूंचा 'तो' व्हिडिओ चर्चेत

Saturday Horoscope: धनत्रयोदशीला 4 राशींचे भाग्य उजळणार, कामाच्या ठिकाणी बढतीचे योग, वाचा शनिवारचे राशीभविष्य

धक्कादायक! आणखी एका पोलीस कर्मचाऱ्यानं आयुष्य संपवलं, १० दिवसात ३ पोलिसांची आत्महत्या

Chhagan Bhujbal : अधिकार की लढाई में निमंत्रण नही भेजे जाते; छगन भुजबळांनी कुणावर साधला निशाणा? VIDEO

SCROLL FOR NEXT