Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर डिझेल चोरांची टोळी पकडली; ४ अटकेत, दोन वाहने जप्त

Buldhana News : नागपूर- मुंबई अशा समृद्धी महामार्गावर वाहनांची प्रचंड रहदारी आहे. अनेकदा मोठ्या ट्रक रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या जात असतात. या वाहनांमधून डिझेल चोरी केली जात होती.
Samruddhi Mahamarg
Samruddhi MahamargSaam tv
Published On

बुलढाणा : मागील दोन वर्षांत लहान मोठ्या अपघातांनी गाजलेल्या समृद्धी द्रुतगती महामार्ग वाढत्या गुन्हेगारीमुळे देखील वादग्रस्त ठरत आहे. या समृद्धी महामार्गावरील उभ्या असलेल्या वाहनांमधील डिझेल चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान लोणार तालुक्यातील बीबी पोलिसांच्या कारवाईत ही बाब उघड झाली आहे. बीबी पोलीस ठाण्याच्या पथकाने बुलढाणा जिल्ह्यातील चार जणांना ताब्यात घेतले आहे. यातील एक आरोपी हा इंधन चोर टोळीने चोरलेले डिझेल खरेदी करणारा निघाला असताना हि कारवाई करण्यात आली आहे. 

नागपूर- मुंबई अशा समृद्धी महामार्गावर वाहनांची प्रचंड रहदारी आहे. अनेकदा मोठ्या ट्रक रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या जात असतात. या वाहनांमधून डिझेल चोरी केली जात होती. दरम्यान चंद्रपूरच्या कल्याणी टॉवर येथील किरण कुमार लिंगया कनुकुंटल (वय ३८) हे १३ नोव्हेंबर २०२४ रोजी ट्रकने समृद्धी मार्गावरून मुंबई येथून नागपूरकडे जात होते. लांबचा प्रवास असल्याने त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धीवरील दुसरबीड टोल नाक्याजवळ आराम करण्यासाठी आपले मालवाहू वाहन थांबविले. 

Samruddhi Mahamarg
Vasamat Accident : चालकाने ब्रेक ऐवजी क्लच दाबला; दहा फूट लांब ओढत दोघांना चिरडले, वसमतमधील थरारक घटना

गाढ झोपेत असताना चोरले डिझेल 

गाढ झोपेत असताना त्यांच्या वाहनातील पाऊण लाख रुपये किंमतीचे डिझेल अज्ञात चोरांनी लंपास केल्याचे आढळून आले. तसेच वाहनाची समोरील काच फोडल्याचे दिसून आले. प्रकरणी किरण कुमार लिंगया कनुकुंटल यांनी बीबी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली. यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना घटनेचा तपास करण्याचे आव्हान ठाणेदार संदीप पाटील, त्यांचे सहकारी परमेश्वर शिंदे, अरुण सानप, रवींद्र बोरे यांनी यशस्वी रित्या पेलले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण च्या आधारे त्यांनी आरोपींचा छडा लावला. 

Samruddhi Mahamarg
Bike Theft : दुचाकी चोर पोलिसांच्या ताब्यात; दहा दुचाकी जप्त

यानंतर २० डिसेंबरला चिखली पोलीस हद्दीतील गजानन नगर चौफुली भागात पोलिसांनी छापा घातला. यावेळी लक्ष्मण उर्फ संतोष गुलाब लहाने (वय २७, रा. खंडाला मकरध्वज, ता. चिखली), निलेश संतोष भारूडकर (वय ३३, रा. सातगाव भुसारी, ता. चिखली) आणि देविदास प्रकाश दसरे (वय २८, रा. साखर खेरडा, ता. सिंदखेडराजा) यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांच्या जवळील दोन कार जप्त करण्यात आली. तसेच ३५ लिटर क्षमतेच्या ४ प्लास्टिक कॅन देखील जप्त केल्या. 

डिझेल विक्रीला नेत असताना पकडले 

तिघांची कसून चौकशी करण्यात आली असता त्यांनी त्यांच्या चौथ्या सहकाऱ्याची माहिती दिली. २१ डिसेंबरला रात्री उशिरा देऊळगाव घुबे येथील रहिवासी आरोपी सचिन परशराम घुबे (वय २१) याला देखील अटक करण्यात आली. त्याने डिझेल खरेदी केल्याची कबुली दिली. या चौघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान २१ डिसेंबर रोजी रात्री उशिरा ही कारवाई पूर्ण करून बीबी कडे जात असताना पोलीसांना एक संशयास्पद कार आढळून आले. त्याला थांबविले असता त्यातील व्यक्ती अंधाराचा फायदा घेत पसार झाले. त्या वाहनात १८ लिटरच्या कॅन सापडल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com