Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : अनेक गावातील पाणी पुरवठ्याचे स्रोत पुरामुळे दूषित; टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत आमदार कांबळे यांच्या सूचना

Wardha News : वर्धा जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पावसामुळे उद्भवलेल्या समस्याच्या निराकरणबाबत आढावा बैठक घेतली. यात त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करत सूचना केल्या

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे देवळी विधानसभा मतदारसंघातील देवळी, वर्धा आणि हिंगणघाट तालुक्यातील नदी काठच्या गावात पुराच्या पाण्यामुळे पाणी पुरवठयाचे स्रोत दूषित झाले आहे. या गावात येथून पाणी पुरवठा झाल्यास गावातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होईल. यामुळे या गावात जिल्हा परिषदेशी समन्वय साधून तात्काळ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा; अश्या सूचना यावेळी आमदार कांबळे यांनी दिल्या आहे.  

वर्धा (Wardha) जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पावसामुळे उद्भवलेल्या समस्याच्या निराकरणबाबत आढावा बैठक घेतली. यात त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करत सूचना केल्या आहेत. सततच्या (Rain) पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक गावात पाणी शिरल्याने घरातील साहित्याची नासाडी झाली आहे. अनेक रस्ते आणि पूल पुरामुळे वाहून गेले आहेत. या रस्त्यांची, पुलांची तात्काळ दुरुस्ती करावी व कायमस्वरूपी उपायोजनेसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्यात याव्या अश्या सूचना आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना दिल्या आहे.

सोबतच अनेक शेतकऱ्यांनी शेती पीक पुरामुळे अक्षरशः खरडून गेली आहे. तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. या सर्व नुकसानीचा पंचनामा करून शासनाला शेतकऱ्यांना तात्काळ मदतीच्या दृष्टीने प्रस्ताव पाठवावा. यासोबतच ज्या गावातील घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. त्यांना खावटी देत नुकसानीचा तहसीलदारांच्या माध्यमातून पंचनामा करून घ्यावा; अश्या सूचनाही आमदार कांबळे यांनी दिल्या आहे.

गाव पुनर्वसनासाठी पाठपुरावा 
देवळी तालुक्याच्या सोनोरा ढोक या गावात मागील दोन वर्षात नाल्याला येणाऱ्या पुरामुळे पाणी गावात शिरत आहे. मागील वर्षीसुद्धा या गावात पुराने मोठे नुकसान केले होते या वर्षी सुद्धा हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. 28 सप्टेंबर 2023 ला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवाना गावाच्या पुनर्वसन बाबत प्रस्ताव पाठविण्यात आला होता मात्र याला अद्याप मंजुरी मिळाली नाहीय. या गावाच्या पुनर्वसनाच्या प्रस्ताव बाबत पुन्हा शासनाला आताच्या परिस्तितीचा अहवाल जोडून स्मरण पत्र पाठविण्याच्या सूचना आमदार कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या आहे. एवढंच नव्हे तर आमदार कांबळे यांनी राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना याबाबत माहिती देत तात्काळ प्रस्तावाला मंजुरी देण्याची विनंती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT