Manmad Bank Scam : मनमाड स्टेट बँक शाखेत ठेवीदाराची फसवणूक; बँक विमा प्रतिनीधीचा प्रताप

Nashik News : स्टेट बँकेच्या मनमाड शाखेत जानेवारी २०२२ मध्ये बँकेत बसणाऱ्या विमा प्रतिनिधीकडे एक महिलेने पेन्शन प्लॅन योजनेत पैसे गुंतवणूक केले होते.
Manmad Bank Scam
Manmad Bank ScamSaam tv
Published On

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिकच्या मनमाडमध्ये युनियन बँक विमा घोटाळ्याचे प्रकरण ताजे असतानाच आता भारतीय स्टेट बँकेच्या मनमाड शाखेतही फसवणुकीचा एक प्रकार समोर आल्याने ठेवीदारांचे धाबे दणाणले आहे. बँक विमा प्रतिनिधीने बँकेतील ठेवीदारांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. 

Manmad Bank Scam
Maval News : मावळमधील कुंडमळ्यात पर्यटकांना बंदी; पाणी पातळीत वाढ, कुंडदेवी मंदिर पाण्याखाली

स्टेट बँकेच्या मनमाड (Manmad) शाखेत जानेवारी २०२२ मध्ये बँकेत बसणाऱ्या विमा प्रतिनिधीकडे एक महिलेने पेन्शन प्लॅन योजनेत पैसे गुंतवणूक केले होते. त्यानुसार २०२२ ते २०२४ असे तीन वर्षांचे हप्ते महिलेने भरले होते. त्यापैकी पहिला हप्ता अकाऊंटवरून कापण्यात आला. तर दुसरा हप्ता रोख दिला. (Sbi) तिसरा हप्ता फोनपेद्वारे भरला होता. मात्र सदरची रक्कम बँकेत जमाच करण्यात आली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये एकूण सात लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

Manmad Bank Scam
Hingoli News : येलदरी धरणात केवळ ३० टक्के पाणीसाठा; हिंगोली जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा

बँकेकडून अद्याप तक्रार नाही 

दरम्यान याप्रकरणी बँकेच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र फसवणुकीचा प्रकार समोर येऊन (Bank) बँकेकडून पोलिसांत तक्रार करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान हा प्रकारामुळे स्टेट बँकेच्या ठेवीदारांचे धाबे दणाणले असून, आणखी काही लोकांची फसवणूक झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com