Maval News : मावळमधील कुंडमळ्यात पर्यटकांना बंदी; पाणी पातळीत वाढ, कुंडदेवी मंदिर पाण्याखाली

Maval News : मावळ तालुक्यात कालपासून तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वच नदी नाले ओसंडून वाहत आहेत. दरम्यान तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथे असणारी इंद्रायणी नदी देखील दुथडी भरून वाहत आहे
Maval News
Maval NewsSaam tv
Published On

मावळ : राज्यातील अनेक भागात मंगोल आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यानुसार मावळ तालुक्यात देखील तुफान पाऊस सुरु असल्याने इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. कालपासून पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मावलमधील कुंडमळा आता पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. पुढील तीन- चार दिवस येथे बंदी आहे. 

Maval News
Amravati Accident : शेतमजुरांना घेऊन जाणारी रिक्षा उलटली; अपघातात १० शेतमजूर जखमी


मावळ (Maval) तालुक्यात कालपासून तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वच नदी नाले ओसंडून वाहत आहेत. दरम्यान तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथे असणारी इंद्रायणी नदी (Indrayani River) देखील दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे पर्यटन स्थळ असलेल्या कुंडमळा येथे पाणी साकव पुलापर्यंत आले आहे. तसेच कुंडमळा परिसरात असणाऱ्या कुंडदेवी मातेचे मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे. कुंडमळा परीसरात वर्षाविहार करण्यासाठी अनेक पर्यटक येतात. मात्र कुंडमळा येथे पाण्याने रौद्ररूप धारण केल्याने पर्यटकांना येथे बंदी घालण्यात आली आहे.

Maval News
Nandurbar Water Shortage : भर पावसाळ्यात नंदुरबारकरांना पाच दिवसाआड पाणीपुरवठा; धरणात अवघा २१ टक्के पाणीसाठा

आधारवाडी गावात डोंगराचा कळा तुटल्याने एकाचा मृत्यू

मावळ तालुक्यातील लोणावळा जवळील आधारवाडी गावाजवळ डोंगराचा काळा तुटला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली असून यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य एक जण जखमी झाला आहे. मागील ४८ तासात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे डोंगराचा कडा आणि माती मुख्य रस्त्यावर आली आणि पाच ते सहा फूट मातीचा खच रस्त्यावर तयार झाला असून रहदारी पूर्णपणे ठप्प झाली मातीचा ढिगारा काढण्यासाठी प्रशासनाला किमान पाच ते सहा तास वेळ लागण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचां सामना करावा लागत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com