State Home Minister Dr. Pankaj Bhoyar file Pics
महाराष्ट्र

Wardha News: गृहराज्यमंत्र्यांनी पोलीस कुटुंबियांशी संवाद साधतं जाणून घेतल्या समस्या

State Home Minister Dr. Pankaj Bhoyar : जनतेच्या सुरक्षेकारिता पोलीस दिवसरात्र काम करतात त्यांच्याही परिवाराच्या काही अडचणी असतात ते जाणून घेणे आणि त्यांना सोडवणे गरजेचे असल्यानं गृहराज्यमंत्री यांनी संवाद साधलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास, साम प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी वर्ध्यात पोलीस वसाहतीत जातं पोलीस कुटुंबियांशी संवाद साधला. पोलीस कुटुंबियांचा संवाद मेळावा या उपक्रमाची आजपासून गृहराज्यमंत्री यांनी वर्धेतून सुरवात केली आहे. थेट पोलीस वसाहतीत जातं पोलीस कुटुंबियांशी संवाद साधण्याचा हा राज्यातला पहिला प्रयोग आहे. पुढे प्रत्येक जिल्ह्यात पोलीस कुटुंबियांची समस्या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून जाणून त्या सोडविल्या जाईल असं यावेळी गृहराज्यमंत्री म्हणाले.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधतं वर्धेच्या पोलीस वसाहतीत संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांचीही उपस्थिती होती. यावेळी गृहराज्यमंत्री यांनी पोलीस कुटुंबियांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन चर्चेदरम्यान दिले.जनतेच्या सुरक्षेकारिता पोलीस दिवसरात्र काम करतात त्यांच्याही परिवाराच्या काही अडचणी असतात ते जाणून घेणे आणि त्यांना सोडवणे गरजेचे आहे.

यामुळे हा संवाद मेळावा सुरु केला आहे. या माध्यमातून पोलिसांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविल्या जाईल असं यावेळी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलंय. वर्धेपासून पोलीस कुटुंबियांशी सुरु केलेला संवाद मेळावा हा उपक्रम आता राज्यभर राबवीला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितच पोलिसांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. गृहराज्यमंत्र्यांनी सुरु केलल्या या उपक्रमबद्दल पोलीस कुटुंबियांनी त्यांचे आभार मानले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Filmmaker Death: प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांचे ५७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

SCROLL FOR NEXT