Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: भरधाव कार झाडाला धडकली; दोघांचा जागीच मृत्यू

भरधाव कार झाडाला धडकली; दोघांचा जागीच मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : वर्धा ते आर्वी मार्गावरील कामठी शिवारात भरधाव कारचा (Accident) अपघात झाला. भरधाव कार झाडाला धडकल्याने झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच (Accident Death) मृत्यू झाला. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. (Maharashtra News)

रस्त्याच्या बाजूला पंधरा फूट अंतरावर गाडी जाऊन (Wardha) कोसळल्याने रात्रीच्या वेळी कुणालाही माहिती पडले नाही. सकाळच्या सुमारास हा अपघात निदर्शनास आला. खरांगणा येथील ठाणेदार संतोष शेगावकर, (Police) पोलीस उपनिरिक्षक विनोद सानप, अमर हजारे, विठ्ठल केंद्रे यांनी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेमुळ हळहळ व्यक्त होत आहे.

गाडीचा पत्रा कापून दोघांना काढले बाहेर

आंजी येथील प्रज्वल डंभारे आणि राहूल धोंगडे हे दोघे कारने गावी जात होते. दरम्यान कामठी शिवारात हा अपघात घडला. कारची धडक इतकी जोरात होती की, गाडीचा चुराडा झाला आहे. यामुळे गाडीतील दोघांना बाहेर निघता आले नाही. यामुळे कारचे पत्रे गॅस कटरने कापून दोघांनाही बाहेर काढण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरात पुन्हा शिर्डी पोलिसांच्या ताब्यात...

उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला; 45 लाखांची लाच घेताना बड्या सरकारी अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडला

Health Tips : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे काय फायदे आहेत? ९९% लोकांना माहितीच नाहीत

Toothache Remedies : तुमची दाढ सुन्न पडते? आजीच्या बटव्यातील 'हे' रामबाण उपाय घरच्याघरी करा

Health Care : रात्री सतत लघवीला होते? 'या' आजाराची असू शकतात लक्षणं

SCROLL FOR NEXT