Solar Panel Saam tv
महाराष्ट्र

Solar Panel : सावधान! छतावर सोलर सिस्टीम बसवताय; गुणवत्ता नक्की पडताळून पहा, वर्ध्यातील घटनेने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

Wardha News : महावितरणच्या अधिपत्याखाली असणाऱ्या या योजनेत महावितरणचे अधिकारी किंवा कर्मचारी सोलर बसविले जाते. त्या घरी भेट देत नाही, त्याची पाहणी करून अप्रूव्हल न देताच सबसिडी दिली जात आहे

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: विजेची बचत, लोडशेडिंगवर मात आणि मुबलक वीज यासाठी घरी सोलर सिस्टम बसविण्याचा कल आता वाढला आहे. पण घराच्या छतावर बसविलेल्या सोलर सिस्टीमची गुणवत्ता किती? असेच विचारण्याची वेळ वर्ध्यातील एका घटनेने आली आहे. वर्ध्यात आलोडी येथील एका ग्राहकाच्या घरचे सोलर सिस्टिमचे पॅनल हलक्या वादळाने उडाले, हे पॅनल इमारतीच्या खाली पडले. नशीब बलवत्तर खाली कुणी नव्हते. 

सोलर पॅनल उडाल्याची वर्ध्यातील ही पहिली घटना असली, तरी सोलर सिस्टम लावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. महावितरणच्या अधिपत्याखाली असणाऱ्या या योजनेत महावितरणचे अधिकारी किंवा कर्मचारी मात्र सोलर जेथे बसविले जाते. त्या घरी वेळोवेळी भेट देत नाही, त्याची पाहणी करून अप्रूव्हल न देताच सबसिडी दिली जात असल्याचे समोर येत आहे. आलोडी येथील सोलर उडाल्याच्या घटनेमुळे अशा प्रकाराकडे लक्ष वेधले जात आहे. अशा घटना टाळायच्या असतील तर महावितरणचे नियंत्रण अत्यावश्यक असल्याचे ग्राहक यशवंत तीनघसे यांनी सांगितले आहेय.

सोलर सुरु होण्यापूर्वीच पॅनल उडाले 
वर्धा जिल्ह्यातील आलोडी येथील यशवंत तीनघसे यांनी घराच्या छतावर कंपनीसोबत दोन लाख वीस हजाराचा करार करीत सोलर पॅनल बसविले. कंपनीकडून छतावर लोखंडी अँगल ठोकून त्यावर सोलर पॅनल लावण्यात आले आहेत. दरम्यान हे सोलर पॅनल मीटर न बसल्यामुळे अद्याप सुरु झालेले नाही. मात्र महावितरणचे मीटर बसविण्याआधीच हे सोलर पॅनल वादळाने उडाले आहे. 

सुदैवाने जीवितहानी नाही 

वर्धा शहर व परिसरात वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला आहे. या वादळात नव्यानेच बसविण्यात आलेल्या सोलारचे पॅनल उडून घराच्या खाली कोसळले आहे. सुदैवाने घराच्या रिलिंगजवळ अथवा इमारतीच्या खाली कुणी उभे नव्हते, त्यामुळे जीवितहानी टळली आहे. अन्यथा या घटनेत काही दुर्घटना घडण्याची शक्यता होती. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT