Wardha NCP News Saam tv
महाराष्ट्र

शिवसेना व उद्धव ठाकरेंची भाजपच्या दिल्ली नेतृत्वाला भीती; मेहबूब शेख

शिवसेना व उद्धव ठाकरेंची भाजपच्या दिल्ली नेतृत्वाला भीती; मेहबूब शेख

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : शिवसेना व उद्धव ठाकरे यांची भारतीय जनता पार्टीच्या दिल्ली नेतृत्वाला एवढी भीती वाटायला लागली आहे. कारण शिवसेनेचा (Shiv Sena) दसरा मेळावा झाला; तर लाखोंच्या संख्येने जनसागर येईल ही भाजपच्या (BJP) दिल्ली नेतृत्वाला भीती आहे. असे वक्तव्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी केले आहे. (Wardha NCP News)

वर्धेच्या शिववैभव मंगल कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. दसरा मेळाव्यावरून (Dasara Melava) राजकारण करण हे चुकीचे आहे. शिवसेना कुणाची तर ही उद्धव उद्धव ठाकरेंची आहे. जर आमदार फुटल्यावर पक्ष जात असला तर (MNS) मनसेचा एक आमदार आहे. जर उद्या तो एक आमदार फुटला आणी म्हणाला की मनसेच इंजिन चिन्ह माझं आहे. मी मनसेचा अध्यक्ष तर अस होत नाही.

पक्षाची आचारसंहिता असते शेड्युल दहामध्ये काही नियम दिलेले आहे. त्या नियमाप्रमाणे पक्ष हा पक्षप्रमुख आणी पक्षाची कोर कमिटी आहे, त्या हिशोबाने चालतो. तो आमदारांच्या हिशोबाने चालत नाही पक्ष आमदार करतो आमदार पक्ष करत नाही. अशी टीकाही त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव जिल्ह्यातील बोगस बियाणं व बोगस खताचा मुद्दा तापला

Chipi Airport : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबईहून सिंधुदुर्ग अवघ्या १ तासात, १५ ऑगस्टपासून चिपी-नवी मुंबई विमानसेवा सुरू

किडनी स्टोनच्या रुग्णांनी काय खावे आणि काय काय खाऊ नये?|Kidney Stone Diet Tips

Petrol-Diesel: पेट्रोल-डिझेलबाबत महत्वाची अपडेट, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Kaju Katli Recipe: खास कार्यक्रम किंवा सणासुदीसाठी घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट काजू कतली; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT