Pulgaon Police Saam tv
महाराष्ट्र

Pulgaon Police : क्यूआर स्कॅन करून देता येणार अवैध धंद्याची माहिती; थेट टेलिग्रामवर होणार संपर्क, पुलगाव पोलिसांचा उपक्रम

Wardha News : सोशल मिडीयाचे युग असून अनेक लोक सोशल मिडीयचा वापर केवळ मनोरंजनासाठी करतात. मात्र सोशल मीडियाचा फायदा जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस प्रशासनाने अभिनव उपक्रम सुरु केला

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: सोशल मीडियाचा वापर करून पोलीस प्रशासनाने थेट नागरिकांशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न केला आहे. अर्थात गुन्हेगारांसह अवैध धंद्यांची माहिती एक क्यूआर कोड स्कॅन करून थेट पोलिसांना देता येणार आहे. हा अभिनव उपक्रम वर्धा जिल्ह्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले यांनी उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना आपल्या भागात होणारी गुन्हेगारी, अवैध धंदे यांची माहिती देण्यासाठी थेट उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधता येईल.

वर्ध्याच्या पुलगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून डॉ. वंदना कारखेले या रुजू झाल्या आहेत. महिला अधिकारी म्हणून रुजू होताच त्यांनी नागरिकांशी संवाद साधत समस्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. डॉ. वंदना कारखेले यांनी यासाठी एक क्युआर तयार करत टेलिग्रामच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाणार आहे. परिसरात होणारी अवैध वाळू वाहतूक, दारू विक्री, अवैध कृत्य यासंह जिल्ह्यातून तडीपार केलेले गुंड आढळून आल्यास यांची तातडीने माहिती नागरिकांनी याच्या माध्यमातून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

माहिती देणाऱ्याचे नाव राहणार गुप्त 

दरम्यान क्यूआर कोड स्कॅन करून माहिती पोलिसांना देता येणार असून नागरिकांकडून कोणतीही माहिती देताच त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. यासह तात्काळ कारवाई केली जाईल असं डॉ वंदना कारखेले यांनी सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कारखेले यांनी सुरु केलेल्या नागरिक संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुन्हेगारी करणाऱ्यांवर अंकुश लावता येईल. यासह नागरिकांना थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता येईल. 

नागरिकांना आवाहन 

जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात ही संकल्पना राबविण्यात आली आहे.उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी सुरु केलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे या उपक्रमाची सगळीकडे चर्चा आहे. पुलगाव उपविभागाअंतर्गत गुन्हेगार, अवैध व्यावसायिक व महिला, तरुणी यांच्याशी अश्लील वर्तन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याच्या उद्देशाने ही संकल्पना रबविण्यात आली असून नागरिकांनी या माध्यमातून माहिती देण्याचा आवाहन डॉ. कारखेले यांनी केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : विकेंड गेटवेसाठी उत्तम ठिकाणं महाराष्ट्रातली प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं Top 5 ठिकाणं

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT