Wardha News Saam TV
महाराष्ट्र

Wardha News : वडनेरच्या पोलीस निरीक्षकांचा झोपेतच मृत्यू ; घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ

Wardha Police Dies : मनोज वाढीवे असं मृत पोलीस निरीक्षकांच नाव आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Ruchika Jadhav

चेतन व्यास, वर्धा

वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथून एक दु:खद घटना समोर आली आहे. वडनेरच्या एका पोलीस निरीक्षकांचा रात्री झोपेतच मृत्यू झालाय. हृदविकाराच्या धक्याने पोलीस निरीक्षकांचा मृत्यू झाल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मनोज वाढीवे असं मृत पोलीस निरीक्षकाच नाव आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत याबाबत माहिती जाणून घेतलीये.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज वाढीवे हे शुक्रवारी रात्री पोलीस स्टेशनमधील काम आटपून परिसरातील शासकीय निवासस्थानात आराम करण्यासाठी गेले होते. सकाळी पोलीस ठाण्यातील अन्य कर्मचाऱ्यांकडून पोलीस निरीक्षक यांना कामाकरिता वारंवार मोबाइल फोनवर संपर्क करण्यात आले. मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.

पोलीस कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थान गाठत दार वाजवले. मात्र आतमध्ये मनोज वाढीवे मृत अवस्थेत पडले असतील याची पुसटशीही कल्पना त्यांना नव्हती. पोलिसांनी बाहेरून बराचवेळ दार वाजवले, पण कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी दार तोडण्याचा निर्णय घेतला.

घरात प्रवेश करताच पोलीस निरीक्षक हे मृत्वस्थेत आढळून आले. त्यांचा मृत्यू हा झोपेत हृदयविकाराचा धक्का आल्याने झाल्याचं सांगण्यात आलंय. या घटनेमुळे परिसरात आणि पोलीस प्रशासनात खळबळ माजली असून पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Dwarka: द्वारका चौकाची कोंडी फुटणार; २१४ कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

धुक्यामुळे रस्ता दिसला नाही, प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra Election: प्रशासनाचा भोंगळ कारभार; मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदी नियुक्ती

महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, पुण्यात भाजप ठाम शिंदेसेनेला घाम

Maharashtra Live News Update: ठाण्यात प्रमोद गोगावले यांच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर.. परिसरात घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT