Wardha News Saam Tv
महाराष्ट्र

Wardha : गुप्तधनासाठी अघोरी प्रकार, मांत्रिकाकडे न्यायचे पायाळू मुली, व्हिडीओ आणि फोटो सापडले

Wardha News : वन अधिकाऱ्यांनी पुलगाव येथे खवल्या मांजरीची तस्कर करणाऱ्यांना ताब्यात घेतले. या तस्करांनी गुप्तधन मिळवण्यासाठी पायाळू मुलींना मांत्रिकांकडे घेऊन जात असल्याचे सांगितले. यासंबंधित पुरावे त्यांच्या मोबाईलमध्ये आढळले.

Yash Shirke

चेतन व्यास, साम टीव्ही, प्रतिनिधी

वनविभागाने खवल्या मांजरांची तस्करी प्रकरणी वर्ध्यात सहा आरोपींना अटक केले. या सहा तस्करांना ४ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. गुप्तधन शोधण्यासाठी खवल्या मांजराचा वापर केला जातो असे आरोपींनी म्हटले आहे. गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी पायाळू मुलींचाही वापर केल्याची बाब समोर आली आहे.

खवल्या मांजरांच्या तस्करी प्रकरणातील आरोपींकडून वेगवेगळे खुलासे केले जात आहेत. त्यांनी पायाळू मुलींना गुप्तधनासाठी मांत्रिकाकडे घेऊन जात असल्याची बाब उघडकीस आणली आहे. आरोपींच्या मोबाईलमध्ये मोठ्या संख्येत पायाळू मुलीचे फोटो आणि व्हिडीओचा डेटा अधिकाऱ्यांना मिळाला आहे. आरोपींच्या मोबाईलमध्ये अनेक मोबाईल क्रमांक फक्त नंबरने सेव्ह केलेले असून ते कुणाचे आहेत याचाही शोध घेतला जात आहे.

Wardha

आरोपींपैकी अहमद खाँ, अशरफ खाँ हे पायाळू मुलींना मांत्रिकांकडे घेऊन जात असे. वनविभाग त्या मांत्रिकांचाही शोध घेणार असल्याचे म्हटले जात आहे. एकूणच या टोळीचे महाराष्ट्रासह राज्याबाहेरही कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. थोडक्यात वन्यजीव तस्करीचे हे ‘रॅकेट’ मोठे असून त्या दृष्टीने वनविभागाकडून तपास सुरु आहे.

काल वर्ध्यात पुलगाव येथील कॉटन मील परिसरात सहा तस्करांना वनविभाग अधिकारी आणि पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे खवल्या मांजर असल्याचेही उघड झाले. या खवल्या मांजरीचा दोन कोटीत सौदा होणार असल्याचे आरोपींनी सांगितले. तब्बल तीन दिवस पाळत ठेवून वनविभागाने या तस्करांना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : चपलेने मारलं, फावड्याने हल्ला केला; तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला चोपलं,Video व्हायरल

पुणे-सोलापूर महामार्गावर भयंकर अपघात, क्रूझरची ट्रकला जोरात धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला सोनं खरेदी का करतात? आयुष्यात होतो 'हा' मोठा बदल

March End: मार्च संपण्याआधी ही कागदपत्रे जमा कराच, अन्यथा पगारातून होतील पैसे कट; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : नाशिक शहरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार;7 जणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT