Sand Mafia Saam tv
महाराष्ट्र

Sand Mafia : हिंगणघाट तालुक्यात वाळू माफिया सुसाट; वाहतूक करणारे रेतीचे नऊ ट्रक जप्त

Wardha News : दोन दिवसांपूर्वी विधानपरिषद आमदार दादाराव केचे यांनी फेसबुक लाईव्ह करत वाळू माफियाचा भंडाफोड केला. यानंतर सोमवारी पहाटे जिल्हा खनिकर्म अधिकारी व हिंगणघाट तहसीलच्या पथकाकडून कारवाई

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी करण्यात येत आहे. वाळू माफिया सक्रिय झाले असून चोरटी वाळू वाहतूक रोखण्यासाठी कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले होते. त्यानुसार जिल्हा खनिकर्म अधिकारी व हिंगणघाट तहसीलच्या पथकाने कारवाई करत ९ वाळूचे डंपर ताब्यात घेतले आहेत. या कारवाईमुळे मालू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. 

वाळू माफियावर कठोर कारवाई करण्याचे महसूल मंत्री यांचे आदेश असतांनाही जिल्ह्यात वाळूची अवैध उत्तखनन करत वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी विधानपरिषद आमदार दादाराव केचे यांनी फेसबुक लाईव्ह करत वाळू माफियाचा भंडाफोड केला. यानंतर सोमवारी पहाटे वर्धा जिल्हा खनिकर्म अधिकारी व हिंगणघाट तहसीलच्या पथकाने वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या नऊ ट्रकवर कारवाई करून ताब्यात घेतले.

रॉयल्टी नसल्याने नऊ वाहने जप्त 

पहाटे जिल्हा खनिकर्म विभाग आणि तहसील कार्यालय हिंगणघाट यांना अवैध रेतीची वाहतूक सुरू असल्याबाबत माहिती मिळाली. यानंतर दोन्ही पथकाने मिळून हैदराबाद- नागपूर रोडवर कुटकी येथे नऊ वाहने अवैध वाहतूक करतांना मिळाली. या नऊ वाहनमध्ये रॉयल्टी तपासली असता रॉयल्टी नव्हती. तसेच रॉयल्टीला उशिर झाला. त्यामुळे ती वाहन प्राथमिक चौकशीत पंचनामा करून तहसील कार्यालयाचे जमा केले आहे.  

वाळू माफियांचे धाबे दणाणले 

जप्त करण्यात आलेल्या त्या वाहनांवर महाराष्ट्र महसूल अधिनियम अंतर्गत दांडात्मक कारवाई केली जाईल. तसेच तपासात ही वाहन कुठून भरून आले आहेत, याची माहिती देखील समोर येईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं हिंगणघाटचे तहसीलदार योगेश शिंदे यांनी सांगितलय. दरम्यान महसूल विभागाच्या कारवाईने वाळू माफियाचे धाबे दणाणले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: समृद्धी महामार्गावर ९ ते १३ जानेवारी दरम्यान वाहतूक विस्कळीत

Maharashtra Politics: भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातल्या मास्तरासारखी, राष्ट्रवादीच्या नेत्याची सडकून टीका

Gold Rate: आनंदाची बातमी! सराफा बाजारात सोन्याचे दर ९०० रुपयांनी घसरले, चांदीचीही चकाकी उतरली

Thane Accident : ठाण्यात सकाळी विचित्र अपघात, ५ ते ६ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक; अनेक कारचा चुराडा; पाहा VIDEO

Kolhapur Tourism : इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या पन्हाळा किल्ल्याजवळील गड, 'या' ठिकाणी एकदा भेट द्याच

SCROLL FOR NEXT