Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha : भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केली काळी दिवाळी; सरकारचा निषेध करत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे

Wardha News : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, ओल्या दुष्काळच्या पॅकेजमध्ये वाढ़, वनप्राण्यामुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीच्या मदतीत वाढ करणे, शेतकऱ्यांना सोलर पंपाची सक्ती न करता विद्युत कनेक्शन देण्यात यावे

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांप्रती चांगला निर्णय घेण्यात येत नाही. सरकारला वर्ष झाले असताना देखील अद्याप कर्जमाफी देण्यात आलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महाविकास आघाडीने आंदोलनाचे हत्यार उपसले असून यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. 

वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. आंदोलनाला माजी मंत्री रणजित कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. भाजपा सरकारने ही दिवाळी शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी केलीय असं म्हणत आंदोलन करण्यात येत असून धरणे आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला. 

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, ओल्या दुष्काळच्या पॅकेजमध्ये वाढ़, वनप्राण्यामुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीच्या मदतीत वाढ करणे, शेतकऱ्यांना सोलर पंपाची सक्ती न करता विद्युत कनेक्शन देण्यात यावे, शासकीय कंत्राटदारांचे थकीत देयक तातडीने देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. 

तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही; खासदार अमर काळे
सरकारने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आंदोलनाची वेळ आणली आहे. राज्यातल्या भाजपा सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र अजून पर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफिचा मुहूर्त सापडला नाही. शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसानीचे पैसे नाही, विहिरीचे पैसे नाही. यामुळे हा नागरिकांचा सरकार विरोधात असंतोष आहे. आज धरणे आंदोलन केले. पुढे मोर्चे आणी रस्ता रोको आंदोलन करणार. तरीही एकल नाहीय तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही; असा इशारा खासदार अमर काळे यांनी दिला आहे. 

सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल; माजी मंत्री रणजित कांबळे
राज्य सरकारने कर्जमाफिची घोषणा केली, मात्र अद्याप मिळाली नाही. अतिवृष्टी धारकांना मदतीची घोषणा केली. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. तर जिल्ह्यातील 54 मंडळापैकी पहिले 35 मंडलासाठी 142 कोटीची निधी आला. आता जिल्हाधिकारी सांगतात की उर्वरित मंडळाचा प्रस्ताव पाठवला आहे. एकप्रकारे सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. यामुळे दिवाळीच्या दिवशी आंदोलनाची वेळ आल्याचे माजीमंत्री रणजित कांबळे यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart disease: जॅम-च्युइंग गम खाताय? मग सावधान! ‘या’ स्वीटनरमुळे हार्ट अटॅक-स्ट्रोकचा धोका?

Maharashtra News Live Update: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांचे नांदेड विमानतळावर आगमन

Apple vs Grapes: सफरचंद की द्राक्षे, ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते फळ खावे?

Plane Crash : उड्डाण घेताच विमान कोसळलं, लष्कराच्या २ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १४ जणांचा मृत्यू

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! विसर्जन मिरवणुकीत कार घुसली, ४ गणेशभक्तांना धडक दिली अन्...

SCROLL FOR NEXT