MNS Sandeep Deshpande, Avinash Jadhav Chetan Vyas, Saam TV Wardha
महाराष्ट्र

Sandeep Deshpande : वारसा हा वास्तूचा नाही तर विचारांचा असतो; मनसे नेत्याचा उद्धव ठाकरेंना टोला

'विचारांचा वारसा राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे आहे'

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास, साम टिव्ही

MNS Sandeep Deshpande News : वारसा हा वास्तूचा नसतो तो विचारांचा असतो आणी हा विचारांचा वारसा राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे आहे, असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टोला लागवला. राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याच्या अनुषंगाने मनसे नेते विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. यावेळी वर्धा येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. (Wardha News Today)

विदर्भात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मनसेला विदर्भात नवीन उभारी देण्याचा प्रयत्न केला जातं आहे. आज वर्धा (Wardha) शहराच्या स्थानिक विश्रामगृहात मुंबई येथून आलेल्या मनसे नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आढावा घेतला. या आढावा बैठकीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

'बाळासाहेब ठाकरे यांचे विचार राज ठाकरेच पुढे घेऊन जाऊ शकतात, असं संदीप देशपांडे म्हणाले. राज ठाकरे हे ज्या प्रभाविपणे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडतात तसं कोणी मांडू शकत नाही. बाळासाहेबांचे विचार हे फक्त राज ठाकरेच पुढे घेऊन जाऊ शकतात. (Wardha News Today Marathi)

'वारसा हा वास्तूचा नसतो तो विचारांचा असतो' आणी हा विचारांचा वारसा हा राज ठाकरेंकडे आहे, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेवर अप्रत्यक्ष टोला लगावला.

यावेळी स्थानिक विश्रामगृहात संदीप देशपांडे, अविनाश जाधव, प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा आढावा घेण्यात आला. वर्धा जिल्ह्यात मनसेचा कसा प्रसार करता येईल यावरही चर्चा करून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT