सचिन बनसोडे, साम टिव्ही
Ahmadnagar Crime News : अहमदनगर जिल्ह्यातून (Ahmadnagar) एक संतापजनक घटना समोर आली आहे. सामाजिक प्रथांचा दाखला देत आईने आपल्या मुलीलाच परपुरूषाशी संबध (Crime) ठेवायला भाग पाडलं. आईने 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला 50 वर्षीय नराधमाच्या हवाली केलं. या नराधमाने अल्पवयीन मुलीचे वारंवार लचके तोडले. राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मनेगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.(Ahmadnagar News Todays)
हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी (Police) पीडित मुलीच्या आईसह नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आबासाहेब भडांगे (वय 50) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पीडीत मुलीच्या मामेभावाच्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही इयत्ता ८ वी मध्ये शिकते. कोपरगाव तालुक्यातील वेस येथे राहाणारा आरोपी आबासाहेब भडांगे याची पीडितेच्या आईशी ओळख होती आणि त्याचे घरी येणे-जाणे होते. पंधरा दिवसांपूर्वी आई पिडीतेला म्हणाली की, तु आता वयात आली आहे, आपल्या समाजात वयात आल्यानंतर बाहेरच्या माणसाशी झोपावे लागते. मीही तेच केले होते आणि आता तुलाही करावे लागेल. (Ahmednagar News Today In Marathi)
मात्र, पीडितेने आपल्याला शाळा शिकायची असून असे घाणेरडे कृत्य करणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर दोन-तीन दिवसातच आरोपी आबासाहेब हा पिडितेच्या घरी आला. त्यावेळी पीडितेच्या आईने तिला आबासाहेब याच्यासोबत झोप अन्यथा तुला पाहून घेईन अशी धमकी दिली. यावेळी आरोपी आबासाहेब याने अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने घरातील एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
नराधम आरोपी दुसऱ्या दिवशीही घरी येणार असल्याने घाबरलेल्या अल्पवयीन पीडितेने गावातच राहणाऱ्या आपल्या मामे भावाचे घर गाठले आणि त्यांना सर्व हकिगत सांगितली. मामे भावाने पीडितेला धीर देत राहाता पोलीस ठाण्यात आरोपीवर लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ नराधम आरोपी आबासाहेब भडांगे आणि त्याला गुन्ह्यात मदत करणाऱ्या पीडितेच्या आईला ताब्यात घेतले आहे.
समाजातील या कुप्रथा बंद झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा पीडीतेने व्यक्त केली आहे. एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे विविध समाजात अनेक कुप्रथा आजही पाळल्या जात आहेत. सरकारने या कुप्रथा मोडीत काढण्यासही आणखी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.