Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : अन् तलाठीच्या परीक्षा केंद्रातून ‘लॅपटॉप’ आणला बाहेर; केंद्राबाहेर उडाला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल

Rajesh Sonwane

चेतन व्यास
वर्धा
: वर्ध्यात तलाठी परीक्षेदरम्यान तांत्रीक सहाय्यकाने केंद्राबाहेर लॅपटॉप आणल्याने परीक्षा केंद्रावर (Wardha) चांगलाच गाेंधळ उडाला. यावेळी पर्यवेक्षक असलेले उपविभागीय महसूल अधिकारी यांनी माहिती (Exam) घेत वरिष्ठांना माहिती दिली. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. (Maharashtra News)

वर्धा शहरातील तानिया कम्प्यूटर लॅबमध्ये सोमवारी २१ ऑगस्टला सकाळच्या सुमारास पटवारीच्या जागेसाठी परीक्षा होती. पहिल्या बॅचच्या परीक्षेदरम्यान परीक्षा घेणाऱ्या टीसीएस एजन्सीचा तांत्रिक सहाय्यक अचानक लॅपटॉप घेऊन परीक्षा केंद्राबाहेर पडला. तांत्रिक सहाय्यक लॅपटॉप घेऊन परीक्षा केंद्राबाहेर एका गल्लीत गेला. हे पाहून बाहेर उभ्या दुसऱ्या तुकडीच्या उमेदवारांनी एकच गोंधळ घातला. वाद चिघळत असल्याचे पाहताच महिला पोलिस कर्मचारीने संबंधित तांत्रिक सहायकाला तातडीने केंद्रात परतण्यास सांगितले. यावेळी पर्यवेक्षक म्हणून असलेले उपविभागीय महसूल अधिकारी दीपक करंडे यांनी प्रकारची माहिती घेत वरिष्ठना अवगत केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

लॅपटॉप बाहेर नेल्याची तक्रार प्राप्त होताच केंद्राची तपासणी करण्यात आली. सीसीटीव्हीचीही तपासणी करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने घडलेल्या प्रकाराची माहिती परीक्षा एजन्सी टीसीएस आणि विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे. परीक्षा सुरु होण्यापूर्वी त्या परीक्षेचा ड्राईव्ह डाऊनलोड केला जातो. हे काम परीक्षा सुरु होण्यापूर्वी दोन ते तीन तास आधी केले जाते. कोण कोण परीक्षा देणार याची माहिती त्या ड्राईव्हमध्ये असते. परीक्षा एजन्सीच्या व्यक्तीने परीक्षा केंद्रात जामर लागून असल्याने ड्राईव्ह डाऊनलोड करण्यासाठी बाहेर आल्याचे सांगितले. तलाठी यांची परीक्षा ही सर्व्हर बेस आहे. या परीक्षेदरम्यान कोणतेही इलेक्ट्रॉनिक वस्तू परीक्षा केंद्राच्या बाहेर नेण्याची परवानगी नाही. टीसीएसचे तांत्रिक कर्मचारी हा परीक्षे दरम्यान लॅपटॉप कसा बाहेर घेऊन गेला आणि का याचा तपास होणे गरजेचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT