Chandrayaan-3 Mission : चंद्रयान ३ चे यशस्वी लँडिंगसाठी प्रार्थना; दगडूशेठ गणपतीला केला महाअभिषेक

Pune News : चंद्रयान ३ चे यशस्वी लँडिंगसाठी प्रार्थना; दगडूशेठ गणपतीला केला महाअभिषेक
Chandrayaan-3 Mission
Chandrayaan-3 MissionSaam tv
Published On

सचिन जाधव 

पुणे : भारताची चंद्रयान ३ मोहीम यशस्वी व्हावी. या मोहिमेत भारताच्या शास्त्रज्ञाना यश मिळावे; यासाठी (Pune) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने मंदिरात आज पहाटे भालचंद्र गणेशास अभिषेक करण्यात आला. यासाठी दूध, दही, विविध फळांचे रस सुकामेवा आदींचा वापर करण्यात आला. (Live Marathi News)

Chandrayaan-3 Mission
Farmer Success Story: कर्टुल्याने केलं लखपती! 3 महिन्यातच शेतकरी झाला मालामाल; संघर्षगाथाही तेवढीच मोठी

चांद्रयान ३ च्या चंद्रावर लॅंडिंगची वेळ आता जवळ आली आहे. चांद्रयान आज (२३ ऑगस्ट) संध्याकाळी चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंगचा प्रयत्न करेल. चांद्रयान २ च्या अयशस्वी प्रयत्नानंतर आता या मोहिमेकडून इस्रोला (ISRO) बऱ्याच अपेक्षा आहेत. या मोहिमेकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. चांद्रयानाने १४ जुलैला आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथून उड्डाण घेतले होते. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या शक्तीपेक्षा सुमारे सहा पटीने कमी आहे. त्यामुळे चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग करणे अत्यंत आव्हानात्मक आहे. त्यातच इस्रोने चांद्रयानाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे आत्तापर्यंत कोणत्याच देशाचे यान यशस्वीरित्या उतरू शकलेले नाही.

Chandrayaan-3 Mission
Manjra Dam: बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यावर पाणी संकट; आठवडाभरात धरणातील पाणीसाठा झाला कमी

नुकतेच २० ऑगस्टला रशियाचे लुना २५ हे अंतराळयान तेथे उतरण्याच्या प्रयत्नात क्रॅश झाले. त्यामुळे आता भारत या मोहिमेत यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनेल. आज संध्याकाळी भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे. त्याचे लँडिंग सुरक्षित व्हावे; यासाठी हा अभिषेक करण्यात आला. याशिवाय गणपती बाप्पांचा मुकुटावर चंद्रकोर लावून भालचंद्र शृंगार करत बाप्पाला सजवण्यात आले. मोहीम यशस्वी व्हावी यासाठी गणपती बाप्पाला प्रार्थना करण्यात आली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com