Manjra Dam
Manjra DamSaam tv

Manjra Dam: बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यावर पाणी संकट; आठवडाभरात धरणातील पाणीसाठा झाला कमी

Beed News बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यावर पाणी संकट; आठवडाभरात धरणातील पाणीसाठा झाला कमी
Published on

बीड : बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मोठं पाणी संकट ओढवण्याची (Beed) शक्यता निर्माण झाली आहे. या तीन जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे मांजर धरणातील पाणीसाठा (Manjra Dam) कमी होत आहे. यामुळे भविष्यात पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे. (Latest Marathi News)

Manjra Dam
Maharashtra NCP News: शरद पवारांच्या इशाऱ्याकडे अजित पवार गटाचे दुर्लक्ष... प्रफुल पटेलांच्या बॅनरवर झळकले फोटो; चर्चांना उधाण

बीडच्या केज तालुक्यातील धनेगावच्या मांजरा धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याचं समोर आलं आहे. गेल्या आठवड्यात २६.२२ टक्के असणारा पाणीसाठा आज घडीला २४.९८ टक्क्यांवर आला असून अवघ्या एका आठवड्यामध्ये तब्बल १.२२ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. यामुळे भर पावसाळ्यात पाणीसाठा कमी होत असल्याने चिंता व्यक्त केले जात असून बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यावर पाणी संकट ओढवण्याचं चित्र निर्माण झाले आहे.

Manjra Dam
Bhandara News: प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाचा लॉजमध्येच मृत्यू; धक्कादायक कारण आलं समोर

महिनाभरापासून पाउस नाही 
दरम्यान गेल्या एक महिन्यांपासून बीड जिल्ह्यात पाऊस नाही. यामुळे जिल्ह्यातील धरणे कोरडे पडत आहेत. तर नद्या आजही ओस पडलेल्या आहेत. यामुळे पुढील काही दिवसात पाऊस पडला नाही; तर मोठं पाणी संकट बीड जिल्ह्यात निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com