Wardha News Saam Digital
महाराष्ट्र

Wardha News: या कंत्राटदारांनाच विकास कामे द्या....आमदाराने चक्क नावांची यादीच पाठवली? कोणत्या मतदारसंघातील आहे प्रकार?

Wardha News: मतदारसंघाच्या विकासासाठी वेगवेगळ्या विभागामार्फत निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र आर्वी विधानसभा मतदारसंघात प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत सन २०२३-२४ करिता मंजूर करण्यात आलेली कामे याच कंत्राटदाराला द्यावीच, असं पत्रच जिल्हा परिषदेकडे सादर केरण्यात आलं आहे.

Sandeep Gawade

चेतन व्यास

Wardha News

मतदारसंघाच्या विकासासाठी वेगवेगळ्या विभागामार्फत निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र आर्वी विधानसभा मतदारसंघात प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत सन २०२३-२४ करिता मंजूर करण्यात आलेली कामे याच कंत्राटदाराला द्यावीच, असं पत्रच कंत्राटदारांच्या नावांची यादी आणि मोबाइल क्रमांकसह आर्वी विधानसभा मतदारसंघांचे आमदार दादाराव केचे यांनी जिल्हा परिषदेकडे सादर केली होती. मात्र या यादीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील उपसचिवांनी जिल्हा परिषदेला पत्र पाठवून आमदारांनी सुचविलेल्या कामांना थांबविण्याच्या सूचना केल्या आहेत. तर दुसरीकडे यादीत पाठविलेली नावं ही भाजपा कार्यकर्त्यांची असून उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविले जातील असं आमदार केचे यांनी म्हटलं आहे.

आर्वी विधानसभा मतदारसंघातील पर्यटन विकास योजनेच्याच्या ३९ कामांसाठी जवळपास सात कोटींचा निधी प्राप्त झाला. या निधीनंतर भाजपा आमदार दादाराव केचे यांनी चक्क कंत्राटदार, संपर्क क्रमांक आणि कामे कोणत्या यंत्रनेला द्यावी याबाबत थेट पत्रच जिल्हापरिषदेला दिले. या पत्रावर उपसचिव यांनी कामे थांबाविण्याचे निर्देश दिले. पण हे पत्र ज्या उपसचिवांनी जारी केलं आहे, त्या पत्राबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती नसून त्यांना न कळवता हे पत्र जारी करण्यात आलं आहे. सोबतच याबाबत उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून काही कामे ग्रामपंचायत तर काही कामे सोसायटीमार्फत केली जाणार आहे. पंधरा दिवसात या कामांचे भूमिपूजन सुद्धा केले जाणार असल्याच आमदार केचे यांनी म्हटल आहे. सोबतच कोणीतरी खोडसाळपणा करत असल्याचही त्यांनी सांगितलंय. यामुळे केचे यांचा रोख कुणाकडे आहे हा चर्चेचा विषय बनला आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वर्धा जिल्ह्याच्या आर्वी विधानसभा मतदारसंघ मागील दोन विधानसभा निवडणुकीपूर्वी नेहमीच चर्चेत राहिला आहे. मागील निवडणुकीच्या वेळेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खासगी सचिव सुधिर दिवे यांनी मतदारसंघात कार्यक्रमाचा सपाटा लावला होता. पण उमेदवारी मिळविण्यात ते अयश्वस्वी झाल्याने पुन्हा दादाराव केचे यांच्या गळ्यात माळ पडत ते निवडून आले. तर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव सुमित वानखेडे हे सक्रिय झाल्याने या मतदारसंघात पुन्हा भाजपामध्ये शीतयुद्ध पहावयला मिळत आहे. दादाराव केचे आणि सुमित वानखेडे यांच्यातील शीतयुद्ध आता भजपाच्या कार्यक्रमात सुद्धा पहायला मिळत आहे. एवढंच नाही तर या पत्राबाबतही त्यांनी कोणीतरी खोडसाळ पणा केल्याचा म्हटल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवार १५ हजार मतांनी आघाडीवर

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

SCROLL FOR NEXT